भाजपच्या पाठीशी महिला शक्ती ढाल म्हणून उभी (BJP Pankaja Mundhe) राहील
“गरिबांचे कल्याण आणि महिलांचा सन्मान” हे भाजपचे मुख्य धोरण आहे. इतिहासातील प्रत्येक युगात स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आज भाजपने स्त्रीशक्तीचे युग आणले असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत हीच स्त्रीशक्ती भाजपच्या पाठीशी ढाल म्हणून उभी राहील, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी (BJP Pankaja Mundhe) व्यक्त केला.
यावेळी निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप म्हणाले, विरोधक टीका करतील; मात्र भाजप विकासावरच बोलणार आहे. पुढील पन्नास वर्षांचा विचार करून वाहतूक नियोजन, पाणी व्यवस्थापन, वाहतूक कोंडीमुक्त शहर, वेगवान व विस्तारित मेट्रो, तसेच सर्वसामान्यांना स्वतःचे घर मिळावे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली (BJP Pankaja Mundhe) आहे.
