Home माझं पिंपरी चिंचवड Mahesh Landge:प्रभाग क्रमांक २१ मधील भाजप–आरपीआय (आ.)च्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा

Mahesh Landge:प्रभाग क्रमांक २१ मधील भाजप–आरपीआय (आ.)च्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा

आमदार महेशदादा लांडगे यांचे पिंपरीकरांना आवाहन

by Admin
Spread the love

पिंपरी (प्रतिनिधी) :“पिंपरी-चिंचवडकरांनो, तुमचा स्वाभिमान बारामतीच्या पायाशी ठेवू नका. ही निवडणूक केवळ राजकीय नसून आपल्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची आहे,” असे ठणकावून सांगत आमदार महेशदादा लांडगे यांनी प्रभाग क्रमांक २१ मधील भाजप–आरपीआय (आठवले) आघाडीच्या चारही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे (Mahesh Landge)आवाहन केले.

पिंपरी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित भव्य महासभेत ते बोलत होते. पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर व जिजामाता रुग्णालय परिसरातील प्रभाग क्रमांक २१ साठी सौ. उषाताई संजोग वाघेरे, सौ. मोनिका सुरेश निकाळजे, गणेश ढाकणे आणि नरेश पंजाबी हे भाजप–आरपीआय (आ.)चे अधिकृत उमेदवार असून त्यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात (Mahesh Landge)आली.

“स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना साद घालण्यासाठीच मी येथे आलो आहे,” असे स्पष्ट करत आमदार लांडगे यांनी नाव न घेता विरोधकांवर जोरदार टीका केली. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या सभेत भाजप व स्थानिक नेतृत्वावर बेछूट आरोप करण्यात आल्याचा उल्लेख करत ते म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन आम्हाला शहाणपण शिकवण्याची किंवा लंगोट बांधायला शिकवण्याची कोणालाही गरज (Mahesh Landge)नाही.”

स्थानिक प्रश्नांवर बोलताना आमदार लांडगे म्हणाले की, “पिंपरी गावाला काय हवे आहे, हे बारामतीत बसून कसे कळणार? पंचवीस वर्षे पालकमंत्रीपद आणि एकहाती सत्ता असूनही शहरासाठी ठोस काम झाले नाही. रेड झोन, डेअरी फार्ममुळे अनेक स्थानिक भूमिहीन झाले; तीस वर्षांत हे प्रश्न सुटले नाहीत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर साडेबारा टक्के प्रश्न मार्गी(Mahesh Landge )लागला.”

 

ते पुढे म्हणाले की, “आजपर्यंत शहराला २९ महापौर मिळाले; पण एकालाही पुढे जाण्याची संधी दिली गेली नाही. आमच्या सुख-दुःखात सहभागी होणारा, आमच्यातलाच नेता आम्हाला हवा आहे, विमानातून फिरणारा नाही.” पिंपरी-चिंचवड शहरातील माता-भगिनी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पोलीस आयुक्तालय मंजूर करून घेतल्याचेही त्यांनी (Mahesh Landge)सांगितले.

“पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन खोटे आरोप आणि बदनामी थांबवा. शहरातील नागरिक भाजपचे काम पाहूनच मतदान करत आहेत. ही निवडणूक स्थानिक नेतृत्वाला बदनाम करणाऱ्यांना शहरातून हद्दपार करण्याची आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त (Mahesh Landge) केले.

संजोग वाघेरे राज्याच्या राजकारणात जाणार – लांडगे

यावेळी बोलताना आमदार लांडगे म्हणाले, “मनातील राग-द्वेष विसरून संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. त्यांनी अनेक लोक जोडले असून योग्य वेळी निर्णय घेत भाजपमध्ये प्रवेश केला. आज संपूर्ण भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत.”

लोकसभेत संजोग वाघेरे यांना साडेसहा लाखांहून अधिक मते मिळाल्याचा उल्लेख करत, “आपला माणूस मोठा होऊ द्या. संजोग भिकू वाघेरे भाजपकडून राज्याच्या राजकारणात जाणार म्हणजे जाणारच,” असा विश्वास त्यांनी व्यक्त Mahesh Landgeकेला.

आता हाताला हाताने उत्तर देऊ” – संजोग वाघेरे पाटील

माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनीही यावेळी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. “पिंपरी गावचा विकास आजपर्यंत सर्व नगरसेवकांच्या सामूहिक प्रयत्नांतून झाला आहे. सर्वाधिक उद्याने, सुसज्ज जलतरण तलाव, ग्रामदैवत मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाला २०१२ मध्ये मंजुरी मिळाली असून भाजप सरकारमुळेच हा प्रकल्प मार्गी लागला आहे. लवकरच हा पूल नागरिकांसाठी खुला होईल,” असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असून विरोधकांचा सुपडा साफ होईल. खोट्या आरोपांना बळी पडू नका. टीका झाली तर आता हाताला हाताने उत्तर देऊ.”

या महासभेस विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, कामगार नेते बाबा कांबळे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सभेला पिंपरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली असून महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00