Home मनोरंजन Pratibha Junior College:प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचे ‘जल्लोष महाराष्ट्राच्या संस्कृतीचा’ वार्षिक स्नेहसंमेलन धुमधडाक्यात साजरे

Pratibha Junior College:प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचे ‘जल्लोष महाराष्ट्राच्या संस्कृतीचा’ वार्षिक स्नेहसंमेलन धुमधडाक्यात साजरे

चिंचवड येथील कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘जल्लोष महाराष्ट्राच्या संस्कृतीचा’ हा कार्यक्रम लोककला, नृत्य व सांस्कृतिक सादरीकरणातून धुमधडाक्यात साजरा झाला.

by Admin
Spread the love

चिंचवड:चिंचवड येथील कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘जल्लोष महाराष्ट्राच्या संस्कृतीचा’ हे विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून अत्यंत जल्लोषात आणि धमाकेदार वातावरणात (Pratibha Junior College)पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाची रंगत वाढवली. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा आणि लोककलेचा ठसा उमटवणाऱ्या विविध नृत्यप्रकारांचे सादरीकरण या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. भूपाळी, वारकरी दिंडी, जोगवा, गोंधळ, कोळी, शेतकरी जीवनावर आधारित नृत्य तसेच पोवाडा या लोकनृत्यप्रकारांचे सुंदर व सशक्त सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. पारंपरिक वेशभूषा, जोशपूर्ण ताल आणि विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण(Pratibha Junior College) झाले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योजक अनिल भांगडीया होते. त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद पुणे विभागाचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी भूषविले. तर कॅप जेमिनीचे संस्थापक सदस्य हिरामनी गवई यांची विशेष उपस्थिती लाभली. उपस्थित सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक(Pratibha Junior College) केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वर्षा निगडे तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून प्रतिभा महाविद्यालय, विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे यावेळी विशेष कौतुक(Pratibha Junior College) करण्यात आले.

या कार्यक्रमास कमला शिक्षण संस्थेचे संस्थापक-सचिव डॉ. दीपक शहा, संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा, संस्थेच्या संचालिका डॉ. तेजल शहा, बी.एड. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, प्रतिभा वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, प्रतिभा एमबीए महाविद्यालयाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. वृंदा जोशी, प्रतिभा महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित(Pratibha Junior College) होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र निरगुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वर्षा निगडे(Pratibha Junior College) यांनी केले.

https://youtube.com/watch?v=R_kDm–wYkM&si=nJm-x9cVuhFvRk7h


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00