Home गुन्हे Police Bribery:‘हफ्ता’ न दिल्यास रिक्षा अडवणाऱ्या महिला पोलीस शिपाई आणि ट्रॅफिक वॉर्डनला ACBचा सापळा

Police Bribery:‘हफ्ता’ न दिल्यास रिक्षा अडवणाऱ्या महिला पोलीस शिपाई आणि ट्रॅफिक वॉर्डनला ACBचा सापळा

पिंपरी वाहतूक विभागातील महिला पोलीस शिपाई आणि ट्रॅफिक वॉर्डन यांना रिक्षा चालकाकडून ४०० रुपयांची लाच स्वीकारताना ACBने रंगेहात पकडले.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी: पिंपरी वाहतूक विभागातील एक महिला पोलीस शिपाई आणि एका ट्रॅफिक वॉर्डनला ४०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. रिक्षा चालकाकडून दर महिन्याला ५०० रुपयांचा ‘हफ्ता’ मागितल्याची तक्रार आल्यानंतर ही कारवाई करण्यात  आली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये महिला पोलीस अंमलदार वर्षा विठ्ठल कांबळे (३५) आणि ट्रॅफिक वॉर्डन कृष्णा मछिंद्र गव्हाणे (२८) यांचा समावेश आहे. तक्रारदार रिक्षाचालक पिंपरी, मोरवाडी आणि केएसबी चौक परिसरात प्रवासी (Police Bribery)वाहतूक करतात.

१७ नोव्हेंबर रोजी जादा प्रवासी घेतल्याच्या कारणावरून आरोपींनी रिक्षा चालकाकडून ३०० रुपये घेतले होते. त्यानंतर २६ नोव्हेंबरला पुन्हा रिक्षा अडवून दर महिन्याला ५०० रुपयांचा हफ्ता देण्याची मागणी केली. सततच्या छळाला कंटाळून रिक्षा चालकाने एसीबीकडे तक्रार  (Police Bribery)दाखल केली.

तक्रारीची पडताळणी करताना आरोपींनी तडजोडीअंती ४०० रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले. त्यानुसार २९ नोव्हेंबर रोजी केएसबी चौकात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ४०० रुपये घेताच वॉर्डन कृष्णा गव्हाणे यांना ACBने रंगेहात पकडले. त्यानंतर महिला पोलीस शिपाई वर्षा कांबळे यांनाही ताब्यात घेण्यात (Police Bribery)आले.

या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई (Police Bribery) करण्यात आली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00