Home मनोरंजन Musical Event:सुमधुर गाण्यांची रंगलेली मैफल | “ना सांगताच आज हे कळे मला” सांगीतिक कार्यक्रम

Musical Event:सुमधुर गाण्यांची रंगलेली मैफल | “ना सांगताच आज हे कळे मला” सांगीतिक कार्यक्रम

गदिमा नाट्यगृहात मराठी–हिंदी चित्रपटगीतांची मंत्रमुग्ध करणारी मैफल

by Admin
Spread the love

प्रतिनिधी – विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत “ना सांगताच आज हे कळे मला…” या मराठी–हिंदी चित्रपटगीतांच्या निरुपम आणि नि:शुल्क दृक्‌–श्राव्य मैफलीने गदिमा नाट्यगृहात रसिकांना मंत्रमुग्ध केले.निगडी प्राधिकरण येथील गदिमा नाट्यगृहात गुरुवारी झालेल्या या खास सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद (Musical Event)दिला.

 

कार्यक्रमाला दिशा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, साहित्यिक राज अहिरराव, मल्लिकार्जुन इंगळे, विलास गादडे, अॅड. स्मिता शेटे, उषा शेटे, सार्थक भिंगारे, साक्षी भिंगारे, साहिल कांबळे, अनिल घाडगे, राजू भिंगारे, सुनीता भिंगारे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची (Musical Event)उपस्थिती लाभली.

 

वैविध्यपूर्ण गीतांची श्रवणीय मेजवानी

नंदकुमार कांबळे, विनायक कदम, सुचिता शेटे, डॉ. आरोही पाटे, डॉ. संदीप गायकवाड, अतिथी गायिका ललिता जगदाळे, सतीश कापडी, अरुण सरमाने, नेहा दंडवते आणि विलास खरे या गायक–कलाकारांनी कृष्णधवल काळातील गीतांपासून २००० च्या दशकातील गाण्यांपर्यंत वैविध्यपूर्ण सादरीकरण करून(Musical Event)  रसिकांची मने जिंकली.

 

प्रत्येक गीतासोबत त्या गीताच्या निर्मितीचा रोचक इतिहास आणि संबंधित चित्रपटातील दृश्ये प्रदर्शित केल्यामुळे रसिकांना स्मरणरंजनाचा अनोखा अनुभव (Musical Event) मिळाला.

लक्षवेधी सादरीकरणे

सून साईबा सून…’, ‘फकिरा चल चला चल’, ‘तूने ओ रंगीले कैसे जादू किया’, ‘झुमका गिरा रे’, ‘यह काली काली आंखें’ अशी लोकप्रिय एकल गीते तसेच‘आके तेरी बांहो में’, ‘तू चीज बड़ी है मस्त मस्त’, ‘दिल हूं हूं करे’, ‘तुमको पिया दिल दिया’, ‘अच्छा जी मैं हारी’ अशी युगुल–द्वंद्व गीते प्रेक्षकांच्या मोठ्या दादीत (Musical Event)सादर करण्यात आली.

 

बालकलाकार सिया आणि तिचे वडील डॉ. संदीप गायकवाड यांनी सादर केलेले “अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना” हे गीत विशेष दाद मिळवणारे (Musical Event)ठरले.

कार्यक्रमाचा उत्कर्षबिंदू)

कार्यक्रमाच्या शीर्षकगीताचे “ना सांगताच आज हे कळे मला” या गीताचे सादरीकरण रसिकांना भावले.

कार्यक्रमाचा समारोप “ऐसा पहली बार हुआ है सत्रह–अठरा सालों में…” या धमाल गीताने करण्यात आला.या मैफलीचे संयोजन विनायक कदम आणि नंदकुमार कांबळे यांनी केले. सचिन शेटे यांनी विशेष साहाय्य केले. ध्वनिसंयोजन शैलेश घावटे, तांत्रिक सहाय्य व छायाचित्रण विक्रम क्रिएशन यांनी केले. निवेदन सीमा (Musical Event)  गांधी यांनी केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00