Home गुन्हे Khed Liquor Raid:पुणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; १ लाख १४ हजारांचा बनावट दारू साठा जप्त

Khed Liquor Raid:पुणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; १ लाख १४ हजारांचा बनावट दारू साठा जप्त

खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून बनावट देशी व विदेशी दारूच्या एकूण १ लाख १४ हजार ६२५ रुपयांच्या साठ्याचा पर्दाफाश केला. दोन आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक ३ ने कारवाई करत १ लाख १४ हजार ६२५ रुपयांचा बनावट मद्यसाठा जप्त केला आहे.मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, खेड तालुक्यातील नाणेकरवाडी (मुत्केवाडी) येथे सुरू असलेल्या अवैध मद्यविक्री अड्ड्यावर २५ नोव्हेंबर रोजी छापा टाकण्यात आला. या कारवाईत पावर लाईन पंच या देशी दारूच्या १८० मिली आणि ९० मिली क्षमतेच्या ६४४ बनावट सीलबंद बाटल्या, तसेच ७१ विदेशी बनावट सीलबंद बाटल्या आणि बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा सर्व मिळून १ लाख १४ हजार ६२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त (Khed Liquor Raid) करण्यात आला.

 

या प्रकरणी अहमदसाब पठाण आणि हरीष ब्रिजेशकुमार चंद्रा यांना अटक करून त्यांना मे. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, खेड यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावून त्यांना येरवडा कारागृहात पाठविण्यात (Khed Liquor Raid)आले.

 

कारवाईदरम्यान भरारी पथक क्रमांक ३ चे निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक वाय. एम. चव्हाण, पी. ए. ठाकरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. डी. साठे, तसेच जवान अमर कांबळे, अनिल दांगट, गिरीश माने, जगन्नाथ चव्हाण, जयदास दाते आणि वाहनचालक शरद हांडगर यांनी सहभाग (Khed Liquor Raid)घेतला.

 

महाराष्ट्रात प्रतिबंधित, बनावट व गावठी हातभट्टी दारू निर्मिती-विक्रीमुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याने, अशा प्रकारची माहिती मिळाल्यास त्वरित राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी (Khed Liquor Raid)सांगितले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00