Home पुणे Nana Kate Campaign Head:पिंपरी-चिंचवड निवडणूक : नाना काटे प्रचारप्रमुख म्हणून नियुक्त

Nana Kate Campaign Head:पिंपरी-चिंचवड निवडणूक : नाना काटे प्रचारप्रमुख म्हणून नियुक्त

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी विठ्ठल उर्फ( Nana Kate Campaign Head) नाना काटे यांची प्रचारप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी दाखविलेल्या विश्वासाबद्दल अजितदादा पवार आणि सुनील तटकरे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करताना नाना काटे म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वदर्शन, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि पक्षाच्या विचारधारेच्या ( Nana Kate Campaign Head) बळावर प्रभावी, सकारात्मक आणि संघटित प्रचारयोजना उभारण्याचा त्यांचा निर्धार आहे.

 

काटे म्हणाले, “पक्षनेतृत्वाने आमच्यावर दाखविलेला विश्वास नक्कीच सार्थ ठरवू. पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भक्कम विजय मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेने काम करू. कार्यकर्ते आणि जनतेचा विश्वास हीच पक्षाची खरी ताकद असून त्याच बळावर आपण ही निवडणूक ( Nana Kate Campaign Head) यशस्वीपणे लढवू.”

शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षाची भूमिकेला मानणारे नागरिक यांना सोबत घेऊन शहराच्या विकासाची गती वाढवण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
“विकासाची वाटचाल सुरूच राहील…” असा( Nana Kate Campaign Head)   उत्साहवर्धक संदेशही काटे यांनी यावेळी दिला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00