Home माझं पिंपरी चिंचवड Hindu Samrajya Din:हिंदू साम्राज्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

Hindu Samrajya Din:हिंदू साम्राज्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

हिंदू साम्राज्य दिनानिमित्त तुळजा भवानी वस्ती येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. नगरसेविका रेश्मा बापू कातळे यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मान.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :हिंदू साम्राज्य दिनानिमित्त तुळजा भवानी वस्ती परिसरात सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान, संकल्प सोशल फाउंडेशन, सकल हिंदू समाज तुळजा भवानी वस्ती तसेच खांदेश तिळवण तेली समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी (Hindu Samrajya Din)जपली.

 

या रक्तदान शिबिरात नगरसेविका रेश्मा बापू कातळे यांनी विशेष पुढाकार घेत रक्तदात्यांचे प्रोत्साहन केले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बापूजी दिनकर कातळे यांचीही प्रमुख उपस्थिती(Hindu Samrajya Din) होती.

 

रेश्मा बापू कातळे यांनी रक्तदान हे सर्वोत्तम दान असून अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे सांगितले. युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी (Hindu Samrajya Din)केले.

 

कार्यक्रमास सह्याद्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सभासद, तिळवण तेली समाजाचे सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक जाणिवेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात (Hindu Samrajya Din)आले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00