चिंचवड : “रक्तदान हेच श्रेष्ठदान” या संदेशाचा प्रसार करत मा. श्री. चतुरभाऊ झब्बूलाल आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत आयोजित करण्यात येणार (Blood Donation Camp)आहे.
महाकाल पार्किंग, आहेर इस्टेट, लोकमान्य हॉस्पिटलसमोर, चिंचवड येथे होणाऱ्या या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले (Blood Donation Camp)आहे.
या उपक्रमाचे आयोजन स्व. पै.झब्बूलाल समाजसेवा प्रतिष्ठान, चिंचवड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित व विधी विभाग (पिंपरी-चिंचवड शहर), राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले(Blood Donation Camp) आहे.
रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले (Blood Donation Camp)आहे.
