Home गुन्हे Chinchwad Suicide Case:चिंचवड स्टेशन परिसरात धक्कादायक घटना; २१ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

Chinchwad Suicide Case:चिंचवड स्टेशन परिसरात धक्कादायक घटना; २१ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

चिंचवडमधील डी-मार्टमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने विष प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रेमसंबंधांवरील कुटुंबीयांच्या विरोधामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय; पोलीस तपास सुरू.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : चिंचवड स्टेशन परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली (Chinchwad Suicide Case) आहे.

 

आकांक्षा चंद्रकांत डोळारे (वय २१, रा. आनंदनगर, चिंचवड स्टेशन) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती डी-मार्टमध्ये काम करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कामावर असताना तिने विष प्राशन केले. मात्र, याबाबतची माहिती तिने तत्काळ कोणालाही दिली(Chinchwad Suicide Case) नव्हती.

 

यानंतर पुढील चार ते पाच दिवस तिला जुलाब, उलट्या आणि अशक्तपणाचा त्रास जाणवत होता. प्रकृती अधिक खालावल्याने शनिवारी तिला थेरगाव येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी सुमारे पावणे आठ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू (Chinchwad Suicide Case) झाला.

 

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आकांक्षा हिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि त्याच्याशी विवाह करण्याची तिची इच्छा होती. मात्र, कुटुंबीयांनी या नात्याला विरोध केल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात (Chinchwad Suicide Case)आहे.

 

या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू(Chinchwad Suicide Case) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00