Home संस्कृती Kalarang PCMC :साहित्य, संस्कृती आणि कलेचा गौरव; निगडीत ‘सारस्वतांचा गौरव सोहळा’ आयोजित

Kalarang PCMC :साहित्य, संस्कृती आणि कलेचा गौरव; निगडीत ‘सारस्वतांचा गौरव सोहळा’ आयोजित

निगडी येथे कलारंग संस्थेच्या वतीने ‘सारस्वतांचा गौरव सोहळा’ आयोजित. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा ३ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवडमध्ये साहित्य, संस्कृती आणि कलेचा सन्मान करण्यासाठी कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने ‘सारस्वतांचा गौरव सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात येणार असून, हा साहित्यप्रेमींसाठी विशेष सोहळा ठरणार (Kalarang PCMC)आहे.

 

या कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री व ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभूणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्यासह नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार करण्यात येणार (Kalarang PCMC)आहे.

 

कार्यक्रमात विविध विभागांचे कार्यवाह आणि जिल्हा प्रतिनिधींचाही गौरव होणार असून, निवेदनाची जबाबदारी रविंद्र खरे यांच्याकडे असणार(Kalarang PCMC) आहे.

 

हा सन्मान सोहळा शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. साहित्य, विचार आणि कलेच्या माध्यमातून समाजाला दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार अमित गोरखे आणि आयोजकांनी केले (Kalarang PCMC) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00