प्रतिनिधी :आर्थिक वर्ष २०२५-२६ संपण्यास अवघे काही तास शिल्लक असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ९२० कोटी ६३ लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. यंदाच्या वर्षासाठी महापालिकेने १,००० कोटी रुपयांच्या वसुलीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले असून, ते पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून शेवटच्या क्षणीही जोरदार प्रयत्न सुरू (PCMC Property Tax) आहेत.
चालू वर्षात आतापर्यंत ५ लाख ६० हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी आपला कर भरला आहे. महापालिकेच्या ‘अभय योजने’ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, या योजनेतून सुमारे १५७ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. विशेष म्हणजे, ५५ हजारांहून अधिक करदात्यांनी या योजनेचा लाभ घेतला (PCMC Property Tax)आहे.
करदात्यांची सोय लक्षात घेऊन ३१ मार्च रोजी रात्री १० वाजेपर्यंत सर्व विभागीय कर संकलन कार्यालयांचे कॅश काउंटर सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला (PCMC Property Tax)आहे.
दरम्यान, इतकी मोठी वसुली होऊनही अद्याप २ लाख ३ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी कर भरलेला नाही, आणि त्यांच्याकडे सुमारे ६२२ कोटी रुपयांची थकबाकी बाकी(PCMC Property Tax) आहे.
ऑनलाइन कर भरण्याला यंदा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दिली असून, डिजिटल पेमेंटमुळे महसुलात लक्षणीय वाढ झाली (PCMC Property Tax)आहे.
आता उर्वरित काही तासांत महापालिका १,००० कोटींचा ऐतिहासिक टप्पा गाठणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले(PCMC Property Tax) आहे.
