Home आरोग्य PCMC Water Supply :पिंपरी-चिंचवडला पाणीटंचाईतून दिलासा; पवना धरणातून अतिरिक्त १०० एमएलडी पाण्यास मंजुरी

PCMC Water Supply :पिंपरी-चिंचवडला पाणीटंचाईतून दिलासा; पवना धरणातून अतिरिक्त १०० एमएलडी पाण्यास मंजुरी

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :वाढत्या नागरीकरणामुळे पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पवना धरणातून शहरासाठी अतिरिक्त १०० एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी उचलण्यास राज्य सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळणार ( PCMC Water Supply ) आहे.

 

पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना

 

शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता सध्याचा पाणीपुरवठा अपुरा पडत होता. अनेक भागांत कमी दाबाने किंवा दिवसाआड पाणी मिळत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत होत्या. त्यामुळे पाण्याचा कोटा वाढवण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न( PCMC Water Supply ) केले.

बैठकीत निर्णयाला मंजुरी

 

मुंबई येथे झालेल्या बैठकीत पवना धरणातील पाणी आरक्षणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराची वाढती गरज आणि भविष्यातील संभाव्य संकट लक्षात घेऊन अतिरिक्त १०० एमएलडी पाणी देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे महापालिकेला आता अधिकृतपणे धरणातून अतिरिक्त पाणी उचलणे शक्य होणार असून, वितरणातील तांत्रिक अडचणी दूर करून सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू( PCMC Water Supply ) आहे.

 

विकासाला मिळणार चालना

 

पाणीपुरवठ्यात वाढ झाल्यामुळे निवासी भागांबरोबरच आयटी हब आणि औद्योगिक क्षेत्रातील पाणी समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. नवीन गृहनिर्माण प्रकल्प आणि विस्तारत असलेल्या उपनगरांना यामुळे पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होईल. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा हा निर्णय पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक ठरत असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला यामुळे गती मिळणार ( PCMC Water Supply ) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00