प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरण सेक्टर 27 येथील श्री राम सेवा मंडळाच्या राम मंदिरात रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. समस्त हिंदू समाजाचे आराध्य दैवत भगवान श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि पारंपरिक देखाव्यांनी नटले असून भाविकांच्या स्वागतासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली (Ram Mandir Pradhikaran) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दिनांक 26 मार्च रोजी दुपारी 12 वाजता श्रीराम जन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती अपेक्षित असून मंदिर परिसरात भक्तीमय आणि उत्सवी वातावरण अनुभवायला मिळणार ( Ram Mandir Pradhikaran) आहे.
श्री राम सेवा मंडळाच्या वतीने 19 मार्च ते 26 मार्च या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी भजन, प्रवचन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असून त्यामध्ये स्थानिक भजनी मंडळे, महिला मंडळे आणि कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. ‘भक्तिरंग’, ‘चांदणे स्वरांचे’, ‘गीतरामायण’ यांसारख्या कार्यक्रमांमुळे उत्सवाला विशेष रंगत आली ( Ram Mandir Pradhikaran)आहे.

तसेच काही दिवसांमध्ये ‘विष्णुसहस्रनाम’ पठण, स्तोत्र सादरीकरण, देशभक्तीपर ‘वंदे मातरम्’ कार्यक्रम अशा विविध उपक्रमांद्वारे धार्मिक आणि सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या कार्यक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत( Ram Mandir Pradhikaran) आहे.
रामनवमीच्या दिवशी पहाटे काकड आरती, सकाळी श्रीराम जन्म कीर्तन आणि दुपारी 12 वाजता श्रीराम जन्म सोहळा व महाआरती पार पडणार आहे. त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले( Ram Mandir Pradhikaran) आहे.
मंदिर परिसरात केलेली आकर्षक सजावट, प्रकाशयोजना आणि धार्मिक देखावे यामुळे संपूर्ण प्राधिकरण परिसर भक्तीमय झाला आहे. या उत्सवामुळे नागरिकांमध्ये धार्मिक उत्साह वाढला असून सर्वजण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने सहभागी होत( Ram Mandir Pradhikaran) आहेत.
श्री राम सेवा मंडळाचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने हा महोत्सव यशस्वीपणे पार पडत असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीराम जन्मोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले( Ram Mandir Pradhikaran) आहे.
