प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सन २०२६-२७ च्या मूळ अर्थसंकल्पात तब्बल ४१४ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली असून, शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. प्रशासनाने सादर केलेल्या मूळ अर्थसंकल्पात सुधारणा करत सुमारे ११०० नवीन उपसूचना स्वीकारण्यात आल्या (PCMC Budget 2026) आहेत.
या सुधारित अर्थसंकल्पामध्ये स्थानिक विकासकामांना गती देण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला १० लाख रुपयांचा विशेष निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रभागस्तरावरील तातडीच्या आणि आवश्यक कामांना चालना मिळणार(PCMC Budget 2026) आहे.
पिंपरी-चिंचवडच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या विविध कामांचा समावेश केल्यामुळे अर्थसंकल्पाचा एकूण आकार वाढला असून, प्रलंबित कामे मार्गी लागण्यास मदत होणार (PCMC Budget 2026)आहे.
या अर्थसंकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नगरसेवकांसाठी जाहीर करण्यात आलेला स्वनिधी. प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागातील रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज लाईन, पथदिवे, तसेच सार्वजनिक स्वच्छतेशी संबंधित कामांसाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील नागरी समस्या सोडवण्यास गती (PCMC Budget 2026)मिळेल.
इतक्या मोठ्या प्रमाणात उपसूचना स्वीकारल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. वाढीव निधीमुळे शहराच्या सौंदर्यीकरणासह वाहतूक कोंडी कमी करणे आणि पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर खर्च अपेक्षित(PCMC Budget 2026) आहे.
एकूणच, वाढीव अर्थसंकल्पामुळे पिंपरी-चिंचवडच्या विकास आराखड्याला नवी दिशा मिळणार असली, तरी मंजूर निधीचा योग्य वापर आणि कामांचा दर्जा यावरच शहराच्या भविष्यातील प्रगती अवलंबून राहणार(PCMC Budget 2026) आहे.
