प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी-प्राधिकरण हा परिसर अत्यंत महत्त्वाचा आणि नियोजनबद्ध भाग म्हणून ओळखला जातो. उच्चभ्रू, सुशिक्षित आणि सजग नागरिकांचे वास्तव्य असलेल्या या भागात सध्या मनपाच्या ‘हरित सेतू’ प्रकल्पावरून वातावरण तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पाविरोधात नागरिकांचा तीव्र विरोध पाहायला मिळत (Harit Setu Protest) आहे.
प्राधिकरण बरखास्त केल्यानंतर मोकळ्या जागा पीएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आल्या, तर प्राधिकरणाने विकसित केलेला निवासी भाग पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे देण्यात आला. त्यानंतर मनपाने एफएसआय चारपट वाढवल्याचे समजते. त्यामुळे या परिसरात नव्या इमारतींचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशा परिस्थितीत विद्यमान रस्ते सुस्थितीत ठेवणे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ‘बॉटल नेक’ दूर करणे आणि त्रिस्तरीय वाहतूक व्यवस्था सक्षम करणे अपेक्षित असताना ‘हरित सेतू’च्या नावाखाली रस्ते अरुंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी वाहतूक कोंडी वाढल्याचेही ते सांगत(Harit Setu Protest) आहेत.

भक्ती-शक्ती चौक ते वाल्हेकरवाडी, रावेत, मुकाई चौक, किवळे या मार्गांवरील वाहतूक आधीच वाढलेली असताना ‘हरित सेतू’मुळे अनेक ठिकाणी कोंडीची समस्या अधिक गंभीर बनली (Harit Setu Protest) आहे.
मनपाच्या या प्रकल्पामुळे प्रशस्त रस्ते अरुंद झाले, अनावश्यकपणे फुटपाथ वाढवण्यात आले आणि रस्त्यांवर झाडे लावण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे वाहतुकीवर होणाऱ्या संभाव्य ताणाबाबत नागरिकांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. “सध्याचे रस्ते आधीच वर्दळीचे आहेत. त्यात असे बदल केल्यास परिस्थिती अधिक बिकट होईल,” अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली (Harit Setu Protest) आहे.

या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून नागरिक विविध मार्गांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. शांततामय आंदोलने, निवेदने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी बैठका अशा माध्यमांतून विरोध नोंदवला जात (Harit Setu Protest) आहे.
या आंदोलनाला संघटित स्वरूप देण्यासाठी ‘NPRF’ (निगडी-प्राधिकरण-रावेत फोरम) या सामाजिक व्हॉट्सअॅप ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते विलास कुटे,निलेश शिंदे, अतुल भोंडवे, विलास कुटे, विजय नाईक, अॅड. प्रतिभा दलाल आणि अॅड. अर्जुन दलाल यांनी समविचारी नागरिकांना एकत्र आणत हा मंच उभारला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने आंदोलन, पाठपुरावा आणि जनजागृती केली जात (Harit Setu Protest) आहे.
पुणे शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील स्वतः रस्त्यावर उतरून प्रयत्न करत असताना, पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांचा विरोध असूनही प्रशासन काम जबरदस्तीने रेटत असल्याची भावना नागरिकांनी महापौर रवी लांडगे यांच्यासमोर (Harit Setu Protest) मांडली.
वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांनी काल प्रत्यक्ष परिसराला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि आक्षेप जाणून घेतले. तसेच, “नागरिकांच्या हिताला प्राधान्य देऊनच पुढील निर्णय घेतला जाईल,” असा सकारात्मक दिलासा दिला. तात्पुरत्या स्वरूपात काम थांबवण्याचे आदेश देत नागरिकांच्या समस्यांचा विचार करून आराखडा सुधारित करण्याचे निर्देशही त्यांनी (Harit Setu Protest) दिले.
महापौरांच्या या भेटीनंतर नागरिकांमध्ये काही प्रमाणात आशावाद निर्माण झाला आहे. मात्र, प्रकल्पाबाबत प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार आणि नागरिकांच्या मागण्यांना कितपत न्याय मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काळात या प्रश्नावर ठोस तोडगा निघेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार (Harit Setu Protest) आहे.
प्रतिक्रिया
प्राधिकरणातील सर्व रहिवाशांनी सध्या ज्या पद्धतीने ‘हरित सेतू’ प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे, त्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. सध्याचा प्रकल्प हा प्रामुख्याने फक्त पादचाऱ्यांच्या सोयीसाठीच राबवला जात असल्याचे चित्र दिसत आहे. फुटपाथ अत्यंत मोठे करून रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने काम सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
रहिवाशांची मुख्य मागणी अशी आहे की, रस्त्यावरील वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठीच्या सुविधा यांच्यात योग्य समतोल राखला गेला पाहिजे. मात्र, सध्याच्या कामांमुळे फुटपाथ मोठे करण्यात आले असून त्यामुळे वाहतुकीची कोंडी, ध्वनी प्रदूषण आणि अपघातांची शक्यता वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हा लढा प्राधिकरणातील प्रत्यक्ष परिस्थिती, तसेच नागरिकांकडून रस्ते आणि पदपथाचा होणारा वापर लक्षात घेऊनच लढला जात आहे. वाहतूक आणि पादचारी या दोन्ही घटकांमध्ये समतोल राखणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे ठाम मत आहे. सध्या ‘हरित सेतू’ प्रकल्प केवळ पादचाऱ्यांवर केंद्रित असल्याचे जाणवत असल्याने त्याला विरोध वाढत(Harit Setu Protest) आहे.
उदाहरणादाखल, भेळ चौक (ज्ञानेश्वर चौक) येथे आधीच मोठ्या प्रमाणात वाहतूक असताना रस्त्याची रुंदी कमी करण्यात आल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यातील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली (Harit Setu Protest) आहे.
ऍड अर्जुन दलाल
प्राधिकरणाचे प्रशस्त रस्ते आणि मुबलक पार्किंगची सोय ही असलेली ओळख पुसून टाकत, वाहतूक कोंडी आणि फुटपाथवरील अनधिकृत टपऱ्या अशी नवी ओळख निर्माण करणारा ‘हरित सेतू’ प्रकल्प ठरत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या गरजा आणि मागण्या पूर्णपणे दुर्लक्षित करून काही अधिकारी व लोकप्रतिनिधींनी मनमानीपणे हा प्रकल्प लादल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
परिसरातील रहिवाश्यांच्या मते, हा प्रकल्प त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम करणारा ठरत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विविध गैरसोयींसोबतच वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या दंडात्मक कारवाईचा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात(Harit Setu Protest) आहे.
याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी या प्रकल्पास तीव्र विरोध दर्शवत महापौरांकडे आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन महापौरांनी पुढील अभ्यास आणि निर्णय होईपर्यंत सुरू असलेल्या कामांना स्थगिती देण्याचे आदेश दिले (Harit Setu Protest) आहेत.
निलेश शिंदे
पुणे पिंपरी चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कधीही सक्षम नव्हती. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने दुचाकी चारचाकी गाड्या घ्याव्या लागल्या. आजही पायाभूत सुविधांची उभारणी चालू आहे. पूर्ण क्षमतेने कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. पिंपरी चिंचवड मध्ये जास्तीत जास्त गाड्या वापराव्या लागतात त्यासाठी रस्ते योग्य प्रमाणात रुंद असणे गरजेचे आहे. एका बाजूला FSI वाढवून दिला आहे. आणि त्याच वेळी रस्ते अरुंद करून विकास होऊ शकतो हा विरोधाभास दिसून येत आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडी किमान कमी करण्याचे प्रयत्न तेथील पोलिस अधिकारी करत असताना इथे वाहतूक कोंडी करण्याचे काम का केले जात आहे ह्यामुळे चुकीची धोरणे आखल्याचे दिसून येते. नागरिकांना त्रास होईल अशी विकास कामे आता होणार नाहीत ही अपेक्षा महापौर रवी लांडगे ह्यांच्याकडून आम्ही बाळगून आहोत. कारण ते शहराचे महापौर आहेत. आणि इथे कुणाचाही वैयक्तिक स्वार्थ नाही. समस्या जनतेची आहे. महापौर सर्व सामान्य जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी आमच्या भावनेची दखल घेतली. सकारात्मक बदल होईल ही खात्री(Harit Setu Protest) आहे.
विलास कुटे
