पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) दि. २० मार्च २०२६ :प्रभाग क्रमांक ११ मधील कृष्णानगर येथे गुरुवारी सायंकाळी देशभक्ती, हिंदुत्व आणि अभिमानाचा संगम अनुभवायला मिळाला. तब्बल ५१ फुटी भव्य भगव्या ध्वजाचे राष्ट्रार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्यात आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर सचिन भैय्या लांडगे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाची सांगता (Flag Hoisting) झाली.
ध्वज आकाशात झेपावताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत अभिमान व्यक्त केला. संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला (Flag Hoisting)होता.
या उपक्रमामागे ‘जगदंब प्रतिष्ठान, कृष्णानगर’ यांची संकल्पना असून, स्थानिक नगरसेविका रिटाताई सचिन सानप आणि सामाजिक कार्यकर्ते सचिनदादा सानप यांच्या पुढाकारातून हा भव्य सोहळा साकारण्यात(Flag Hoisting) आला.
कार्यक्रमाला नगरसेवक निलेश दादा नेवाळे, कुंदन भाऊ गायकवाड, योगिताताई नागरगोजे, पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित (Flag Hoisting) होते.
या भव्य ध्वजारोहण सोहळ्यामुळे कृष्णानगर परिसरात नवचैतन्य निर्माण झाले असून, हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचा संदेश अधिक बळकट झाला असल्याची भावना नगरसेविका रिटाताई सानप यांनी व्यक्त (Flag Hoisting) केली.
