Home प्रेरणा / यशकथा Swayamsidha Foundation :मोबाईलचा चुकीचा वापर टाळा; त्यातील सकारात्मक गोष्टींच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व घडवा – प्रा. विजया मारोतकर

Swayamsidha Foundation :मोबाईलचा चुकीचा वापर टाळा; त्यातील सकारात्मक गोष्टींच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व घडवा – प्रा. विजया मारोतकर

पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयात स्वयंसिद्धा प्रतिष्ठान व रयत शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त “पोरी जरा जपून” कार्यक्रम आयोजित. प्रा. विजया मारोतकर यांचे मोबाईल वापर, सायबर धोके आणि तरुणाईच्या व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :मोबाईल फोन वापरणे ही आजच्या काळाची गरज आहे. मात्र त्याचा अतिरेक झाल्यास तो जीवन उध्वस्त करू शकतो. त्यामुळे मोबाईलचा वापर जपून करावा आणि त्यातील चांगल्या गोष्टींचा उपयोग करून आपले व्यक्तिमत्व घडवावे, असे मार्गदर्शन प्रा. विजयाताई मारोतकर (नागपूर) यांनी (Swayamsidha Foundation) केले.

 

स्वयंसिद्धा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड, पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आयोजित “पोरी जरा जपून” या कार्यक्रमात त्या बोलत (Swayamsidha Foundation)होत्या.

 

त्या पुढे म्हणाल्या की, तरुणांना व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीकडे ओढण्यासाठी अनेक अनैतिक यंत्रणा जाळे टाकून बसलेल्या असतात. त्यामुळे याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव मनात ठेवून आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत. वाचनाची सवय जोपासावी. वेगाने बदलणाऱ्या आणि स्पर्धात्मक होत चाललेल्या जगात मोबाईल आणि इंटरनेटचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. मात्र त्याचा वापर करताना सायबर जाळ्यात अडकणार नाही, तसेच कोणत्याही अनैतिक गुन्ह्यात गुंतणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी तरुणाईला (Swayamsidha Foundation) केले.

 

सोमवार, दि. ९ मार्च रोजी रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रा. विजयाताई मारोतकर आणि चारुलता (सोनू दीदी) पुरोहित यांना ‘स्वयंसिद्धा’ पुरस्काराने गौरविण्यात (Swayamsidha Foundation) आले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. कामयानी सुर्वे होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ साहित्यिका सुरेखाताई कटारिया उपस्थित होत्या. यावेळी स्वयंसिद्धा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सविता इंगळे, उपाध्यक्ष नंदकुमार मुरडे, पुरस्कारार्थी प्रा. विजयाताई मारोतकर व चारुलता (सोनू दीदी) पुरोहित, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित(Swayamsidha Foundation) होते.

 

महिला दिनानिमित्त प्रा. विजया मारोतकर व चारुलता (सोनू दीदी) पुरोहित यांना ‘स्वयंसिद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच महाविद्यालयाच्या वतीने डॉ. रुपाली पोखरकर (पीएच.डी. इन इंग्लिश), डॉ. रेश्मा पवार (पीएच.डी. इन केमिस्ट्री), मंदाकिनी सरोदे आणि रोहित खैरनार या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात (Swayamsidha Foundation) आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. कामयानी सुर्वे म्हणाल्या की, पितृसत्ताक व्यवस्थेत स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याची संधी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज स्त्रीचे कर्तृत्व केवळ घरापुरते मर्यादित नसून शिक्षण, विज्ञान, अर्थव्यवस्था आणि समाजकार्यातही ती महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आर्थिक स्वावलंबन आणि सहकार्याच्या भावनेतून आदिवासी व बहुजन समाजातील महिलांची प्रगती साधणे हीच खरी स्त्रीवादी दिशा (Swayamsidha Foundation) आहे.

 

प्रमुख पाहुण्या सुरेखा कटारिया यांनी महिलांना उद्देशून सांगितले की, स्त्रीने स्वतःवर प्रेम करणे आवश्यक आहे. आपण इतरांसाठी खूप कष्ट करतो, मात्र स्वतःचीही काळजी घेणे गरजेचे आहे. सकारात्मक विचार आणि जिद्दीने काम केल्यास महिलांचे भविष्य निश्चितच उज्ज्वल (Swayamsidha Foundation) आहे.

 

स्वयंसिद्धा पुरस्काराच्या दुसऱ्या मानकरी चारुलता (सोनू दीदी) पुरोहित यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महिलांमध्ये आणि मुलींमध्ये जिद्द व चिकाटी असणे आवश्यक आहे. प्रामाणिकपणा आणि जिद्द यांच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते. तसेच यश मिळाल्यानंतर समाजासाठी काहीतरी करण्याची जबाबदारीही आपण पार पाडली (Swayamsidha Foundation) पाहिजे.

 

स्वयंसिद्धा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, महिला दिनाच्या निमित्ताने विविध ऑफर्स आणि सवलती दिल्या जातात; मात्र महिला दिन हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून महिलांच्या संघर्षाची जाणीव करून देत त्यांना अधिक सक्षम करण्याचा दिवस (Swayamsidha Foundation) आहे.

 

यावेळी पुरुषोत्तम सदाफुले, राज अहेरराव, सुरेश कंक, रजनी अहेरराव, शोभा जोशी, राधाबाई वाघमारे, मल्लिकार्जुन इंगळे, दिलीप चक्रे, अंजली टाकळीकर, बाबासाहेब रायकर, प्रा. भाऊसाहेब सांगळे, डॉ. शुभदा लोंढे, डॉ. प्रज्ञा भरड, डॉ. प्रतिमा कदम, डॉ. अर्चना चव्हाण, प्रा. रीमा बत्रा, प्रा. सुषमा चत्तर, सौ. रत्नप्रभा नाईक, प्रा. सीमा ठोंगिरे, डॉ. गणेश खैरे आदी मान्यवर उपस्थित (Swayamsidha Foundation) होते.

 

कार्यक्रमाच्या संयोजनात नंदकुमार मुरडे, प्रा. स्वप्ना हजारे (प्रमुख, महिला मंच, महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी), प्रो. (डॉ.) सुहास निंबाळकर, प्रो. (डॉ.) संगीता अहिवळे आणि डॉ. नीलकंठ डहाळे यांचे सहकार्य (Swayamsidha Foundation) लाभले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रुपाली पोखरकर आणि प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले, तर आभार प्रा. अनुप्रिया प्रभू यांनी(Swayamsidha Foundation) मानले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00