प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नागरिक सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत मिळावी या उद्देशाने ‘महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गंभीर आजार, उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार (Ravi Landge Mayor) आहे.
महापौर रवी लांडगे आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या पुढाकारातून ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेनुसार गरजू रुग्णांच्या उपचारासाठी संबंधित रुग्णालयाच्या नावाने धनादेशाद्वारे आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे उपचाराचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका होऊन गरजू नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सेवा घेणे सुलभ होणार (Ravi Landge Mayor) आहे.
योजनेचा लाभ कसा घ्यावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे बंधनकारक(Ravi Landge Mayor) आहे :
रुग्णाचे आधारकार्ड (सत्यप्रत)
रेशनकार्डाची प्रत
तहसीलदार कार्यालयाकडील उत्पन्नाचा दाखला
स्थानिक नगरसेवकांचे शिफारसपत्र
रुग्णालयाकडून देण्यात आलेले उपचार खर्चाचे (Ravi Landge Mayor) अंदाजपत्रक (डॉक्टरांच्या सही व शिक्क्यासह)
अर्जामध्ये नमूद केलेली माहिती अचूक असणे आवश्यक असून कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात येईल. अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित रुग्णालयाच्या नावाने धनादेशाद्वारे आर्थिक मदत दिली जाणार (Ravi Landge Mayor) आहे.
महापौरांचे मत
“शहरातील गरजू नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत आणि आर्थिक अडचणीमुळे कोणालाही वैद्यकीय सेवा नाकारावी लागू नये, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना उपचारासाठी मदत मिळावी आणि त्यांना दिलासा मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे,”असे मत महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केले.
