Home महाराष्ट्र Cultural Program:सौंदर्यापेक्षा संस्कार महत्त्वाचे – व्याख्यात्या अँड. वृषाली इंगळे-पाटील

Cultural Program:सौंदर्यापेक्षा संस्कार महत्त्वाचे – व्याख्यात्या अँड. वृषाली इंगळे-पाटील

चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त अँड. वृषाली इंगळे-पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान; विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम.

by Admin
Spread the love

चिंचवड, ता. २० : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक सचिव दीपक शहा यांचे प्रोत्साहन आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मोहननगर परिसरातून ढोल-लेझीम, ताशांच्या गजरात व पारंपरिक वेशभूषेत भव्य शिवज्योत मिरवणूक काढली. मिरवणूक महाविद्यालयाच्या प्रांगणात पोहोचताच तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. “छत्रपती शिवाजी महाराज की जय” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून (Cultural Program) गेला.

शिवरायांच्या भव्य मूर्तीचे पूजन व आरती सोलापूर येथील व्याख्यात्या अँड. वृषाली इंगळे-पाटील यांच्या हस्ते पार पडली. यावेळी प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, संयोजक डॉ. रोहित आकोलकर, डॉ. अमोल शिंदे, प्रा. सुकलाल कुंभार, प्रा. सुप्रिया गायकवाड, प्रा. ज्योती इंगळे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी वृषाली लाटे, प्रथमेश गलवाड आदी उपस्थीत (Cultural Program)होते.

“छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण” या विषयावर अँड. वृषाली इंगळे-पाटील यांनी प्रभावी व्याख्यान दिले. व्याख्यानाच्या प्रारंभी त्यांनी विद्यार्थ्यांकडून “मी माझ्या आयुष्यात कधीही व्यसन करणार नाही आणि प्रत्येक स्त्रीचा आदर करेन,” अशी सामूहिक शपथ घेतली. पुढे त्या म्हणाल्या, “सौंदर्यापेक्षा संस्कार अधिक महत्त्वाचे आहेत. शिवचरित्रातील स्वाभिमान, धैर्य, स्त्रीला मातेसमान वागविण्याची भूमिका आणि कर्तव्यनिष्ठा हे गुण तरुणांनी आत्मसात करणे गरजेचे आहे.” मुलींनी धैर्यशील बनावे, तरुणांनी आई-वडिलांचा सन्मान राखावा आणि समाजात माणुसकी जपावी, असे आवाहन त्यांनी केले. चुकीचा इतिहास मांडला जात असल्यास त्याविरोधात सजगपणे आवाज उठवण्याचीही त्यांनी गरज व्यक्त (Cultural Program) केली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘स्वराज्याची पहाट’ हे लघुनाट्य, ‘शिवजन्म पाळणा’ नृत्य तसेच पोवाड्याचे सादरीकरण केले. विद्यार्थी गौरव कालेकर व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या पोवाड्याला उत्स्फूर्त दाद मिळाली. श्री गणेश व्यायाम मंडळ व ब्रह्मसिंह गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी तलवारबाजी व दांडपट्टा अशा मर्दानी खेळांचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा(Cultural Program) मिळवली.

मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी प्रस्ताविकात सांगितले की, संस्थेतील विद्यार्थी अभ्यासासोबत सांस्कृतिक, क्रीडा, बहीःशालेय उपक्रम व एन.एस.एस. माध्यमातून सर्वांगीण विकास साधत आहेत. अशा उपक्रमांतूनच सक्षम नेतृत्व घडते, असे ते(Cultural Program) म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी सानिका गाढवे व निहाल बागल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथमेश गलवाडे, वृषाली लाटे, विराज काशीद, ओम जगताप, प्रतीक गावडे, जानवी धायगुडे, करिष्मा ठाकरे, अनिकेत जगदाळे आदी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम (Cultural Program) घेतले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00