निगडी : रोटरी क्लब ऑफ निगडी, पुणे आणि ज्ञान प्रबोधिनी, पालक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने “कथा राम मंदिराच्या उभारणीची…” या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले (Ram Mandir)आहे.
या कार्यक्रमात अश्विनीताई कवीश्वर या प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. भगवान श्रीरामांच्या भव्य मंदिर उभारणीमागील प्रेरणादायी कथा, नियोजन, वास्तुरचना आणि संपूर्ण प्रवास याविषयी त्या सविस्तर माहिती देणार (Ram Mandir)आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश आफळे हे उपस्थित राहणार आहेत.आज म्हणजेच शुक्रवार, दिनांक . २० फेब्रुवारी २०२६ रोजी
सायंकाळी . ५.०० ते ७.०० दरम्यान मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी, निगडी येथे हा कार्यक्रम होणार(Ram Mandir) आहे.
भगवान श्रीरामांच्या मंदिर उभारणीचा ऐतिहासिक आणि भावनिक प्रवास जाणून घेण्याची ही एक सुवर्णसंधी असून, नागरिकांनी कुटुंबीय व मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले (Ram Mandir)आहे.
