पिंपरी प्रतिनिधी:- पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी पाण्याची गरज लक्षात घेता, शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम ठेवण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी निगडी व चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान सध्याचा पाणीपुरवठा, भविष्यातील मागणी तसेच राबविण्यात येणाऱ्या आणि प्रस्तावित योजनांचा त्यांनी आढावा (Ravi Landge) घेतला.
चिखली परिसरासाठी इंद्रायणी नदीवरील निगोजे बंधाऱ्यातून दररोज सुमारे ९० एमएलडी पाणी उचलण्यात येते. हे पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रिया करून नागरिकांना वितरित केले जाते. भविष्यातील वाढती गरज लक्षात घेऊन भामा आसखेड धरणातून येणाऱ्या पाण्यासाठी २०० एमएलडी क्षमतेचा स्वतंत्र जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाची सद्यस्थिती महापौरांनी प्रत्यक्ष पाहून माहिती घेतली. तसेच आंद्रा धरणातून थेट जलवाहिनी सुरू होईपर्यंत निगोजे येथील सध्याची पंपिंग व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात वापरली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात (Ravi Landge)आली.
यानंतर महापौरांनी निगडी सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. संगणकीय सादरीकरणाद्वारे या केंद्राची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. सुरुवातीला ११४ एमएलडी क्षमतेने सुरू झालेले हे केंद्र शहराचा विस्तार आणि वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आले आहे. सध्या हे केंद्र ५५० एमएलडी क्षमतेने कार्यरत असून पवना नदीतील पाण्यावर प्रक्रिया करून महानगरपालिकेच्या सुमारे ७५ टक्के क्षेत्राला पाणीपुरवठा केला जात (Ravi Landge) आहे.
पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया, गुणवत्ता तपासणीचे निकष तसेच वितरण व्यवस्थेबाबतची माहितीही यावेळी महापौरांना देण्यात आली. भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्प, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, पाणी उचल-शुद्धीकरण-वितरण साखळी, पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी आणि शहरातील पाण्याच्या टाक्यांची क्षमता व स्थिती याबाबतही अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती (Ravi Landge) दिली.
या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी, चीफ केमिस्ट डॉ. प्रशांत जगताप, कार्यकारी अभियंता विजयसिंग भोसले, महेश बरीदे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित (Ravi Landge) होते.
