Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Shivsena:पिंपरी-चिंचवड महापालिका शिवसेना गटनेतेपदी विश्वजित बारणे यांची एकमताने निवड

PCMC Shivsena:पिंपरी-चिंचवड महापालिका शिवसेना गटनेतेपदी विश्वजित बारणे यांची एकमताने निवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी विश्वजित श्रीरंग बारणे यांची एकमताने निवड करण्यात आली. नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय, खासदार श्रीरंग बारणे उपस्थित.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी विश्वजित श्रीरंग बारणे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. शनिवारी शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित सर्व नगरसेवकांनी विश्वजित बारणे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले.महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे एकूण सहा नगरसेवक निवडून आले आहेत. गटनेता निवडीसाठी पक्षाने जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात शिवसेनेच्या गटाची अधिकृत नोंदणी करण्यात ( PCMC Shivsena) आली.

या वेळी शिवसेनेचे उपनेते तथा मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेच्या उपनेत्या नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेवक निलेश बारणे, निलेश तरस, नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस, रेश्मा कातळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करत सत्कार केला आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा  ( PCMC Shivsena)दिल्या.

पिंपरी-चिंचवड शहरात युवा संघटन मजबूत केल्यानंतर विश्वजित बारणे यांनी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी या भागात संघटनात्मक बांधणी भक्कम केली आहे. संघटनेतील प्रदीर्घ अनुभवानंतर त्यांनी प्रथमच निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला. प्रभाग क्रमांक २४ मधून शिवसेनेकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि भाजपचे उमेदवार, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे यांचा मोठ्या फरकाने पराभव ( PCMC Shivsena) केला.

नगरसेवक म्हणून आपल्या पहिल्या कार्यकाळाची सुरुवात करताना त्यांच्या रूपाने महापालिका सभागृहात अभ्यासू, तरुण आणि शहरातील युवा पिढीच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व आले आहे. याच विश्वासातून सर्व नगरसेवकांनी त्यांची गटनेतेपदी निवड केली  ( PCMC Shivsena)आहे.

याबाबत विश्वजित बारणे म्हणाले, “शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे तसेच सर्व नगरसेवकांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. हा विश्वास मी निश्चितच सार्थ ठरवेन. सभागृहात शिवसेनेचा ठाम आवाज ऐकू येईल. शहराच्या विकासासाठी योग्य निर्णयांना आमचा नेहमीच पाठिंबा राहील. मात्र, चुकीच्या कामांना तितक्याच आक्रमकपणे विरोध  ( PCMC Shivsena)केला जाईल.”


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00