Home माझं पिंपरी चिंचवड Ward No 10 BJP:प्रभाग क्रमांक १० मधील भाजप पॅनेलचा ऐतिहासिक विजय | आमदार अमित गोरखे

Ward No 10 BJP:प्रभाग क्रमांक १० मधील भाजप पॅनेलचा ऐतिहासिक विजय | आमदार अमित गोरखे

आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली चारही उमेदवार विजयी, एक बिनविरोध.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड, दि. १६ जानेवारी २०२६ :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करत शहरावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. राज्यातील अनेक महानगरपालिका भाजपच्या ताब्यात गेल्या असून पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता हस्तगत केली (Ward No 10 BJP) आहे.

महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १० मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत पॅनेलने सर्वाधिक मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हा पॅनेल आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली निवडणूक रिंगणात उतरला होता. जनतेने या पॅनेलला भरभरून पाठिंबा देत भाजपच्या विकासात्मक राजकारणावर शिक्कामोर्तब केले (Ward No 10 BJP)आहे.

भाजपच्या अधिकृत पॅनेलमधून प्रभाग क्रमांक १० मध्ये
(अ) श्रीमती अनुराधाताई गोरखे,
(ब) सौ. सुप्रियाताई महेश चांदगुडे (बिनविरोध),
(क) श्री. कुशाग्र मंगलाताई अशोक कदम,
(ड) श्री. तुषार रघुनाथ हिंगे
यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यामध्ये एक उमेदवार बिनविरोध निवडून आला असून उर्वरित तीन उमेदवारांनी हजारोंच्या मताधिक्याने विजय मिळवला(Ward No 10 BJP) आहे.

केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे लोकाभिमुख निर्णय, पारदर्शक प्रशासन, महापालिकेतील सत्ताकाळात राबविण्यात आलेली विकासकामे, तसेच आमदार अमित गोरखे यांचा सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि भक्कम नेतृत्व — या सर्व घटकांचा हा एकत्रित परिणाम असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात (Ward No 10 BJP)आहे.

या विजयाबद्दल सर्व विजयी उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानत, जनतेने दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला (Ward No 10 BJP)आहे.
यावेळी बोलताना अनुराधाताई गोरखे म्हणाल्या,
“प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्यात येईल. प्रभाग क्रमांक १० चा सर्वांगीण व नियोजित विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहू.”
तसेच त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे विशेष आभार(Ward No 10 BJP) मानले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00