पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पेड न्यूज’चा प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आला असून, यामुळे काही उमेदवारांच्या अडचणीत लक्षणीय वाढ झाली आहे. निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत नियमांचे उल्लंघन करून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची गंभीर दखल घेत निवडणूक प्रशासनाने कारवाईचा इशारा ( Paid News Case)दिला आहे.
प्रसार माध्यमांमधून प्रसिद्ध झालेल्या काही बातम्या या उमेदवारांच्या प्रचारासाठी पैसे देऊन प्रसिद्ध केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे स्नेहा कलाटे, कुंदा भिसे, दीपक भोंडवे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश बहल यांना नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय अपक्ष उमेदवार कांचन जावळे यांनाही खुलासा करण्यास सांगण्यात आले (Paid News Case) आहे.
निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीने (MCMC) या बातम्यांची छाननी केली. जाहिरात स्वरूपाच्या बातम्या म्हणून ओळख पटल्यास संबंधित खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जाऊ शकतो. तसेच गंभीर प्रकरणांमध्ये दोष सिद्ध झाल्यास कायदेशीर कारवाई होण्याचीही शक्यता प्रशासनाने व्यक्त केली(Paid News Case) आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, उमेदवारांनी दिलेल्या खुलाशांनंतर पुढील निर्णय घेतला जाईल. नियमांचे उल्लंघन आढळल्यास केवळ खर्चवाढच नव्हे तर निवडणूक प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सर्व उमेदवारांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात (Paid News Case)आले आहे.
महापालिका निवडणुकीत पारदर्शकता राखण्यासाठी आणि मतदारांपर्यंत योग्य माहिती पोहोचावी यासाठी ‘पेड न्यूज’वर कडक कारवाई आवश्यक असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणामुळे निवडणुकीतील प्रचार पद्धतींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले(Paid News Case) आहे.
