Home महाराष्ट्र BJP manifesto:पिंपरी–चिंचवडच्या झेपेसाठी भाजपचा “संकल्पनामा” जाहीर

BJP manifesto:पिंपरी–चिंचवडच्या झेपेसाठी भाजपचा “संकल्पनामा” जाहीर

पिंपरी–चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपचा संकल्पनामा जाहीर. ५०० चौ.फुटांखालील घरांना मालमत्ता करमाफी, ४ हजार इलेक्ट्रिक बसेस, मेट्रो विस्तार व पर्यावरणपूरक विकासाचे आश्वासन.

by Admin
Spread the love

विकसित शहरासाठी ठोस आश्वासने; ५०० चौ.फुटांखालील घरांना मालमत्ता करमाफी,चार वर्षांत पीएमपीएमएल ताफ्यात ४ हजार इलेक्ट्रिक बसेस – आमदार शंकर जगताप

पिंपरी–चिंचवड, दि. १२ जानेवारी (प्रतिनिधी):

देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विकसित महाराष्ट्र’ साकार होत असताना, त्या धर्तीवर विकसित पिंपरी–चिंचवड घडविण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने केला आहे, असे प्रतिपादन आमदार( BJP manifesto)शंकर जगताप यांनी केले.

पिंपरी–चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भाजपचा शहर विकासासाठीचा संकल्पनामा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते आणि आमदार शंकर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी सांगवी येथे जाहीर करण्यात( BJP manifesto) आला.

या वेळी प्रभाग क्रमांक २९, ३१ व ३२ मधील भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत संकल्पनाम्याचे प्रकाशन( BJP manifesto) करण्यात आले.

पाच वर्षांचे स्पष्ट नियोजन

संकल्पनाम्यात पिंपरी–चिंचवड शहराच्या पुढील पाच वर्षांच्या सर्वांगीण विकासाचे स्पष्ट चित्र मांडण्यात आले आहे. मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस, दर्जेदार रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, रोजगारनिर्मिती, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना अशा सर्व क्षेत्रांचा समावेश या संकल्पनाम्यात करण्यात आला ( BJP manifesto)आहे.

पिंपरी–चिंचवडमध्ये मेट्रो आल्याने शहराचा दर्जा उंचावला असून, इलेक्ट्रिक बसेसमुळे पर्यावरण संवर्धनासह सामान्य नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर झाला आहे. राज्यातील महानगरपालिकांमध्ये मूल्यांकनात दुसरा क्रमांक मिळणे ही शहरासाठी अभिमानाची बाब असल्याचेही यावेळी नमूद करण्यात ( BJP manifesto)आले.

मेट्रोचा विस्तार आणि नद्यांतील मेट्रोची व्यवहार्यता

मेट्रो केवळ वाहतुकीचे साधन नसून शहराच्या उत्पादकतेत वाढ करणारी आणि पर्यावरणपूरक असल्याचे सांगत, चिंचवड ते निगडी आणि भक्ती-शक्ती ते चाकण असा ४२ किलोमीटरचा मेट्रो मार्ग सेवेत आणण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच कोचीच्या धर्तीवर पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांमध्ये मेट्रो सुरू करण्याची व्यवहार्यता तपासण्यात येणार( BJP manifesto) आहे.

चार वर्षांत ४ हजार इलेक्ट्रिक बसेस

पीएमपीएमएलच्या ताफ्यात आगामी काही महिन्यांत १,००० इलेक्ट्रिक बसेस दाखल होतील, तर पुढील चार वर्षांत एकूण ४,००० इलेक्ट्रिक बसेस सेवेत येणार असल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी राहणार ( BJP manifesto)आहे.

वाहतूक व पायाभूत सुविधांवर भर

पुणे रिंगरोड वेगाने पूर्ण करून चिखली–मोई–निघोजे–खराबवाडी–मुकाई चौक–किवळे–सांगवडे–चांदखेड या फास्ट कनेक्टर लिंक विकसित केल्या जाणार( BJP manifesto) आहेत.

नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर, देहूरोड ते बालेवाडी उड्डाणपूल, तसेच भोसरी, चाकण व हिंजवडी औद्योगिक परिसरांना रहिवासी भागाशी जोडणारे जलद कॉरिडॉर उभारण्यात येणार आहेत.शहरातील रस्ते एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जागतिक दर्जाचे करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात ( BJP manifesto)आला.

सामान्य नागरिकांना दिलासा

५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबांना मालमत्ता करमाफी देण्यात येणार आहे.अनधिकृत बांधकामांना आळा, रेड झोन हद्द कमी करून सुधारित विकास आराखडा, झोपडपट्टीवासियांना पक्की घरे, पीसीएनटीडीएची लीजहोल्ड नियमावली रद्द करून फ्रीहोल्ड धोरण, तसेच घरांचे हस्तांतरण शुल्क रद्द करण्याचे आश्वासन देण्यात आले( BJP manifesto) आहे.

पर्यावरण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी

पवना, मुळा व मुठा नद्यांच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती, नव्या एसटीपी प्रकल्पांमुळे सांडपाणी थेट नद्यांमध्ये जाणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली.तीस वर्षांवरील सर्व नागरिकांची वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणी, थेरगाव येथे कर्करोग रुग्णालय, ३३ टक्के हरित क्षेत्र वाढविण्याचा उपक्रम, तळवडे येथे ७० एकरांचे जैवविविधता उद्यान, तसेच भटक्या कुत्र्यांचे १०० टक्के लसीकरण व निर्बिजीकरण करण्यात येणार( BJP manifesto) आहे.

औद्योगिक व सांस्कृतिक ओळख

मोशी येथे आशियातील सर्वात मोठ्या एक्झिबिशन व कन्व्हेन्शन सेंटरसह जागतिक दर्जाचे इन्क्युबेशन व डेटा सेंटर उभारून पिंपरी–चिंचवडची औद्योगिक ओळख अधिक बळकट केली जाणार आहे.टाटा समूहाच्या योगदानाची दखल घेत दिवंगत रतन टाटा यांचे स्मारक उभारण्याचाही संकल्प यावेळी जाहीर करण्यात ( BJP manifesto)आला.

पिंपरी–चिंचवडच्या समृद्ध, सुरक्षित व सुविधासंपन्न भविष्यासाठी भाजप कटिबद्ध असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा संकल्पनामा मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त ( BJP manifesto)करण्यात आला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00