Home महाराष्ट्र BJP, Pankaja Mundhe:स्त्रीशक्तीचा सन्मान म्हणजेच भाजपची ओळख – पंकजा मुंडे

BJP, Pankaja Mundhe:स्त्रीशक्तीचा सन्मान म्हणजेच भाजपची ओळख – पंकजा मुंडे

भाजपची भूमिका स्त्रीसन्मानाची असून महिलांनी विकासासाठी पुढे यावे, असे आवाहन पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पिंपरी-चिंचवड येथील प्रचारसभेत केले.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :भाजपची मुख्य भूमिका ही स्त्रीचा सन्मान करणारी आहे. स्त्रीशक्तीशिवाय शिवही शून्य आहे, या विचारातूनच भाजपने स्त्रीशक्तीचे युग निर्माण केले असून महिलांनी आपल्या विकासासाठी ही निवडणूक हाती घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले. येणाऱ्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन करत, विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये, असेही त्या (BJP Pankaja Mundhe) म्हणाल्या.

भारतीय जनता पार्टी व आर.पी.आय. (आ.) मित्रपक्षातील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ रहाटणी येथील विमल गार्डन येथे पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांची प्रमुख (BJP Pankaja Mundhe)उपस्थिती होती.

या प्रचारसभेत

प्रभाग क्रमांक २२ – नीता पाडाळे, कोमल काळे, अ‍ॅड. हर्षद नढे, विनोद नढे

प्रभाग २३ – मनीषा पवार, तानाजी बारणे, सोनाली गाडे, अभिषेक बारणे

प्रभाग २४ – करिष्मा बारणे, सिद्धेश्वर बारणे, शालिनी गुजर, गणेश गुजर

प्रभाग २७ – बाबासाहेब त्रिभुवन, अर्चना तापकीर, सविता खुळे, चंद्रकांत नखाते

प्रभाग २८ – शत्रुघ्न काटे, अनिता काटे, संदेश काटे, कुंदा भिसे

या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात (BJP Pankaja Mundhe) आली होती.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, गेल्या २०–२५ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहराशी माझा ऋणानुबंध आहे. या शहराने नेहमीच विकासाच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे विकासाचा अजेंडा राबविल्यामुळे गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्यांपर्यंत विकास पोहोचला. उज्ज्वला योजना, जनधन योजना, गरीब कल्याण योजना यांसारख्या योजनांमुळे तळागाळातील वंचित घटकांपर्यंत मदत (BJP Pankaja Mundhe) पोहोचली.

जनधन योजनेमुळे महिलांचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा झाले. किसान योजना, बेटी बचाव बेटी पढाव यांसारख्या योजनांतून वंचित घटकांना प्राधान्य देण्यात आले. भाजप म्हणजे विकास आणि विकास म्हणजे प्रत्येक घटकाची प्रगती, हे सूत्र देशाने प्रत्यक्ष अनुभवले आहे, असेही त्यांनी (BJP Pankaja Mundhe) सांगितले.

भाजपने कधीही जातीय किंवा धर्मवादी भूमिका घेतली नाही. कोणतीही योजना रंग, जात किंवा धर्म पाहून राबविली नाही; तर प्रत्येक योजनेत माणुसकीची जाण आहे. गरिबीच्या अंधारातून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग भाजपने खुला केला आहे, असे मुंडे (BJP Pankaja Mundhe) म्हणाल्या.

मुंडे–जगताप यांच्या विचारांचा वारसा जपाजननेते गोपीनाथ मुंडे यांचे आशीर्वाद आपल्यासोबत असून, त्यांच्या समाजाभिमुख कार्याच्या स्मृतींना उजाळा देत भाजपला मतदान करण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. तसेच लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये विकासाचा झंझावात निर्माण केला असून, त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी एक विचाराने भाजपला निवडून द्यावे, असेही त्या म्हणाल्या.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00