Home आरोग्य Pcmc Zero Waste:पिंपरी चिंचवड महापालिकेची स्वयंपूर्ण कचरा व्यवस्थापन मोहीम | कर सवलती व पर्यावरणपूरक उपक्रम

Pcmc Zero Waste:पिंपरी चिंचवड महापालिकेची स्वयंपूर्ण कचरा व्यवस्थापन मोहीम | कर सवलती व पर्यावरणपूरक उपक्रम

पिंपरी चिंचवड महापालिका शहरातील कचरा कमी करण्यासाठी ओला–सुका कचरा विलगीकरण, होम कम्पोस्टिंग, शून्य कचरा प्रकल्प आणि RRR केंद्रांसारखे उपक्रम राबवत आहे. कम्पोस्टिंग युनिट व एसटीपी प्लांट कार्यान्वित करणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करात विशेष सवलती दिल्या जात आहेत.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड शहरात कचरा कमी करून पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी महापालिकेकडून सातत्याने जनजागृती मोहीम राबवली जात आहे. दररोज 100 किलो किंवा त्याहून अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी स्वयंपूर्ण कचरा व्यवस्थापन प्रणाली उभारावी, यासाठी महापालिका सर्वतोपरी सहकार्य करत असून अधिकाधिक सोसायट्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले (Pcmc Zero Waste) आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि आरोग्य कार्यकारी अधिकारी अमित पंडित यांच्या देखरेखीखाली विविध अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये ओला–सुका कचरा विलगीकरण, होम कम्पोस्टिंग, शून्य कचरा प्रकल्प, तसेच आर.आर.आर. केंद्रांद्वारे (Reduce–Reuse–Recycle) पुनर्वापराला चालना( Pcmc Zero Waste) देणे यांचा समावेश आहे.

कचरा व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गृहनिर्माण संस्था, आस्थापना, हॉटेल व्यावसायिक आणि इतर मालमत्ता धारकांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका मालमत्ता करातील सामान्य करावर विशेष सवलती उपलब्ध करून देत आहे. या उपक्रमामुळे अनेक सोसायट्या, शाळा, उद्योगसंस्था आणि आस्थापना कचरा व्यवस्थापनात सक्रिय योगदान देत आहेत. यामुळे शहरातील कचरा संकलनावरील ताण कमी होऊन शाश्वत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वाटचाल वेगाने( Pcmc Zero Waste)सुरू आहे.

महापालिकेकडून मिळणाऱ्या कर सवलती

• ऑन-साईट कम्पोस्टिंग युनिट कार्यान्वित असल्यास : 5% सामान्य करात सूट
• कम्पोस्टिंग युनिट + एसटीपी प्लांट कार्यान्वित असल्यास : 8% सामान्य करात सूट
• फक्त एसटीपी प्लांट कार्यान्वित असल्यास : 3% सामान्य करात सूट
• शून्य कचरा संकल्पना राबविल्यास : 8% सामान्य करात सूट
• शून्य कचरा प्रकल्प + एसटीपी दोन्ही कार्यान्वित असल्यास : 10% सामान्य करात (Pcmc Zero Waste) सूट

अधिकृत प्रतिक्रिया

पिंपरी चिंचवड महापालिका वसुंधरास्नेही शहर घडविण्यासाठी शाश्वत पावले उचलत आहे. कचरा व्यवस्थापनात नागरिक आणि सोसायट्यांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वतःच्या परिसरात कचऱ्याचे कम्पोस्टिंग करणाऱ्या संस्था शहराच्या स्वच्छतेच्या खऱ्या भागीदार आहेत. अशा उपक्रमांना महापालिकेकडून सदैव प्रोत्साहन  (Pcmc Zero Waste)आणि सहकार्य दिले जाते.”
— डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00