Home महाराष्ट्र Pune Leopard News:पुणे औंध सिंध कॉलनीत बिबट्या; वन विभागाची शोधमोहीम

Pune Leopard News:पुणे औंध सिंध कॉलनीत बिबट्या; वन विभागाची शोधमोहीम

औंधमधील सिंध कॉलनीत बिबट्या दिसल्याने खळबळ. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर वन विभाग व रेस्क्यू पथकाचा दिवसभर शोध. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.

by Admin
Spread the love

पुणे प्रतिनिधी:औंधमधील सिंध कॉलनी परिसरात रविवारी पहाटे बिबट्या दिसल्याने मोठी खळबळ उडाली. सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या फिरतानाचा व्हिडिओ स्पष्टपणे कैद झाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू संस्थेचे पथक सकाळीच घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण दिवस सिंध कॉलनीसह आसपासच्या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली; मात्र त्यानंतर बिबट्या पुन्हा दिसला नाही. पथकाचा शोध उशीरापर्यंत सुरू (Pune Leopard News)होता. 

सध्या पुणे जिल्ह्यातील विविध भागांत बिबट्यांचे दर्शन वाढल्याने वन विभागाकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे. आठवडाभरापूर्वी हिंजवडीतील टेकड्यांलगत एका सोसायटीजवळ बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ आला होता. चार दिवसांपूर्वी विमानतळ परिसरातही बिबट्याच्या वावराची तक्रार नागरिकांनी केली होती. त्यातच सिंध कॉलनीमध्ये पहाटे बिबट्या दिसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.

 

दिवसभरात बचाव पथकाने परिसरातील सर्व सोसायट्या, खुले मोकळे प्लॉट, उद्याने यांची पाहणी केली. थर्मल ड्रोनच्या सहाय्याने तपास करण्यात आला. विशेष प्रशिक्षण घेतलेल्या श्वानांच्या मदतीने शोध घेण्यात आला असून, पायांचे ठसे आणि काही पुरावे मिळाले आहेत. तरीही बिबट्या अद्याप आढळलेला नाही.

 

दरम्यान, समाजमाध्यमांवर घटनेची माहिती व्हायरल झाल्याने बघ्यांची गर्दी वाढू लागली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांना घटनास्थळी न जाण्याचे आवाहन केले. दोन आठवड्यांपूर्वी कोल्हापूर, नाशिक आणि नागपूरमध्येही गर्दीच्या भागात बिबट्या शिरल्याच्या घटना घडल्या होत्या. पुण्यातील ताज्या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणा आणखी सतर्क झाली( Pune Leopard News)आहे.

 

वन विभागाची अधिकृत प्रतिक्रिया

“सिंध कॉलनी परिसरात आम्ही आणि रेस्क्यूचे पथक दिवसभर शोधमोहीम राबवत आहोत. पहाटे चारनंतर बिबट्या पुन्हा दिसलेला नाही. नागरिकांनी घाबरू नये, मात्र सतर्क राहणे गरजेचे आहे. पडताळणी न केलेली माहिती सोशल मीडियावर प्रसारित करू नये. बिबट्यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ १९२६ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा,” अशी माहिती पुणे वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले  (Pune Leopard News) यांनी दिली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00