Home पुणे BJP Election Decision:पिंपरी-चिंचवड निवडणूक: भाजप स्वतंत्र की युतीत?

BJP Election Decision:पिंपरी-चिंचवड निवडणूक: भाजप स्वतंत्र की युतीत?

पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढणार की युती करणार, याचा निर्णय स्थानिक कोअर कमिटी घेणार, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र लढवायची की युती करून, याबाबतचा निर्णय स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शहर भाजपची कोअर कमिटी घेणार असून, त्यानंतर वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आज (२२ नोव्हेंबर) आयोजित पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात( BJP Election Decision) ते बोलत होते.

या मेळाव्यास शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार महेश लांडगे, निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, निवडणूक संचालन समितीचे संयोजक आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघटन सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, वैशाली खाड्ये, मधुकर बच्चे, तसेच माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, उषा ढोरे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या (BJP Election Decision) उपस्थित होत्या.

यावेळी विविध पक्ष आणि संघटनांमधील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात बजरंग दलाचे पुणे विभाग संयोजक कुणाल साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अरुण टाक, आशाताई सोदाई, मावळ तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष हेमंत राऊत, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) युवा नेते जगदीश येवले, प्रभाग क्रमांक १७ चिंचवडे नगर येथील धनंजय आंबुसकर, संत तुकाराम नगर प्रभागातील डॉ. संदीप बागडे, प्रभाग क्रमांक १४ चे संतोष चौगुले, तसेच पिंपळे सौदागर येथील उद्योजक संदीप काटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर महिला मोर्चा, युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, कायदा आघाडी, शहरातील सर्व मंडळे आणि विविध आघाड्यांच्या नव्या कार्यकारिण्यांची घोषणा करण्यात (BJP Election Decision) आली.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, “भाजपचे कार्यकर्ते विचारांच्या आधारावर पक्षाशी जोडलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारताची ओळख जगभरात अधिक दृढ झाली आहे. देशहिताचा विचार करणारा पक्ष फक्त भाजप आहे, तर इतर प्रादेशिक पक्षांचा अजेंडा प्रामुख्याने कुटुंबाभोवती फिरत असतो. आपला अजेंडा हा देश आणि देशाच्या प्रगतीसाठी आहे.”तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना प्रत्येक बूथवर ५१ टक्के मतांचे लक्ष्य साध्य करण्याचे आवाहन केले आणि ‘भारत माता की जय’ व ‘वंदे मातरम’चा मंत्र प्रत्येक नागरिकापर्यंत (BJP Election Decision) पोहोचवण्याचे निर्देश दिले.

प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत १०० हून अधिक नगरसेवक निवडून येतील आणि शहरात पुन्हा भाजपचा महापौर होईल. त्यासाठी पदवीधर मतदार नोंदणी वाढविणे अत्यंत आवश्यक (BJP Election Decision )आहे.”

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी ‘शंभर पार’चा नारा देत, महानगरपालिका निवडणुकीत भक्कम विजय मिळवण्याचा संकल्प व्यक्त केला. शहराच्या विकासासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अधिकाधिक लक्ष द्यावे, अशी मागणी  (BJP Election Decision)त्यांनी केली.

मेळाव्याचे प्रास्ताविक शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केले, तर सूत्रसंचालन संघटन सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे यांनी केले. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार( BJP Election Decision )पडला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00