पिंपरी :वंदे मातरम् या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने कर्मयोगिनी महिला संस्थेतर्फे आयोजित ऑनलाइन कवी संमेलन दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी गूगल मीटवर देशभक्तीच्या उत्साहात पार (Online Kavi Sammelan) पडले.
संस्कृती
Namaskar Mahotsav:निखळ मनोरंजनासह सांस्कृतिक प्रबोधन करणाऱ्या नमस्कार महोत्सवाचा उत्साहात समारोप
प्रतिनिधी:निखळ मनोरंजन, समाजाचे आरोग्य संवर्धन आणि सांस्कृतिक प्रबोधन करण्याच्या उद्देशाने नमस्कार फाउंडेशनतर्फे आयोजित पाच दिवसीय नमस्कार महोत्सवाचा समारोप रविवार, दिनांक ०७ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात झाला. निगडी प्राधिकरणातील नियोजित महापौर निवास मैदानावर आयोजित या महोत्सवात विविध प्रकारचा विनामूल्य आरोग्य सल्ला आणि सुविधांचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने (Namaskar Mahotsav) घेतला.
महोत्सवात रविवारी सादर करण्यात आलेल्या ‘हीच खरी फॅमिलीची गंमत आहे!’ या धमाल नि:शुल्क विनोदी नाटकाला थंडीचा कडाका असूनही रसिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली. एस. पी. क्रिएशन्स निर्मित आणि नवनीत प्रकाशित या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन संतोष पवार यांनी केले असून, विसरभोळा बाप, ढालगज आई आणि दिवसा आंधळेपणाचा त्रास असलेली वयात आलेली सुंदर मुलगी असलेले कुटुंब तसेच त्यांच्या शेजारी राहणारे स्मार्ट बायको, कर्णबधिर नवरा आणि एक अडखळत बोलणारा व दुसरा रातांधळा असे दोन दीर असलेले कुटुंब यांच्या धमाल जुगलबंदीवर आधारित हे नाटक प्रेक्षकांना अक्षरशः खळखळून हसवत ठेवणारे ठरले. सागर कारंडे, शलाका पवार, प्रतीक पाध्ये, हर्षदा कर्वे, विनिषा कुलकर्णी, राकेश शालिनी आणि संतोष पवार यांच्या अप्रतिम अभिनयाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद (Namaskar Mahotsav) दिला.
नाट्यप्रयोगापूर्वी सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, सरिता साने, विजया जोशी आणि नमस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवात योगदान देणाऱ्या व्यक्तींना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ज्योती कानेटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून (Namaskar Mahotsav) आभार प्रदर्शन केले.
:पंडित भुवनेशकुमार कोमकल्ली यांच्या शास्त्रीय गायनाने मोरया गोसावी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सांगता
चिंचवड – महासाधू मोरया गोसावी यांच्या संजीवन सोहळ्याच्या 464 व्या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी प्रसिध्द शास्त्रीय गायक आणि पंडित कुमार गंधर्व यांचे नातू पंडित भुवनेशकुमार कोमकल्ली यांनी आपल्या सुरेल शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या अवीट मैफिलीने तिसरा दिवस (Abhangwani) संस्मरणीय ठरला.
शास्त्रीय संगीताचा प्रेक्षकवर्ग निवडक असतो, त्यामुळे उपस्थितीबाबत काहीशी शंका होती. मात्र चिंचवडकर रसिक व मोरया भक्त वेळेवर मोठ्या संख्येने हजर राहिले आणि तब्बल दोन तासांच्या मैफिलीचा मनःपूर्वक आस्वाद (Abhangwani) घेतला.

पंडित कोमकल्ली यांनी राग यमनकल्याणाने मैफिलीची सुरुवात केली. ‘शिव शिव कल्याण करी’ या भजनात यमनकल्याणाची सुंदर गुंफण करून त्यांनी पहिल्याच क्षणी श्रोत्यांची मनं जिंकली. त्यानंतर ‘सुंदर ते ध्यान’ हा अभंग त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादर करत त्यांनी आपल्या समृद्ध अभ्यासाची आणि गायनपरंपरेची झलक(Abhangwani )दाखवली.
यानंतर कबीर, मीरा आणि निर्गुण परंपरेतील भावपूर्ण भजने— ‘मुरशिद नैनो बीच’, ‘भज ले रे मना’, ‘निर्भय निर्गुण’, ‘सुनता है गुरु ज्ञानी’, ‘युगन युगन हम योगी’, ‘शून्य गढ़ शहर’—यांच्या सादरीकरणाने सभागृह भावविभोर(Abhangwani )झाले.

मैफिलीत साथसंगत करणारे कलाकार :
• पेटीवादन : उमेश पुरोहित
• तबला : प्रशांत पांडव
• पखवाज : विनोद तिकोनकर
• सहगायिका : वर्षा बन्सीवाल
• तालवाद्य / टाळ : धनंजय शाळीग्राम
कार्यक्रमादरम्यान कलाकारांचा सन्मान विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वान्स, ऍड. देवराज डहाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पिंपरी चिंचवड देवस्थानचे विश्वस्त व कार्यकर्ते — सत्यजित मुंगी, स्वप्नील देव, वरद देव, धनंजय शाळीग्राम, स्वानंद मोकाशी, केदार बावळे — यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करणे हा एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. कार्यकर्त्यांच्या निष्ठावान श्रमांचे कौतुक करण्याचा हा उपक्रम उपस्थितांना विशेष (Abhangwani)भावला.
या कार्यकर्त्यांनी विनम्रतेने व्यासपीठावर येण्यास नकार दर्शवला होता; मात्र विश्वस्त मंडळींचा आग्रह मानून ते मंचावर आले. नम्रता आणि सेवाभावाची ही झलक पाहून सर्वांच्या मनाला स्पर्श करणारा हाA(bhangwani )प्रसंग ठरला.
शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची ताकद म्हणजे अजाण श्रोत्यांनाही ते सहज भिडते—ही अनुभूती या अभंगवाणीने पुन्हा अधोरेखित केली. तिसऱ्या दिवसाची ही संगीतमय रजनी महोत्सवातील एक स्मरणीय पर्व (Abhangwani)ठरली.
Morya Gosavi Samadhi Mahotsav:४६४ व्या समाधी संजीवन सोहळ्याचा तिसरा दिवस : श्रीसूक्त पठण, चरित्र वाचन, भजन–कीर्तन आणि ‘सामर्थशाली भारत’ व्याख्यानाने भक्तिमय उत्सव यशस्वी
चिंचवड, प्रतिनिधी —मोरया गोसावी महाराजांच्या ४६४ व्या समाधी संजीवन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचे धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळे सोमवार, दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी देऊळमळा, श्री मोरया गोसावी समाधी मंदिर येथे अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाले. दिवसभर चाललेल्या विविध धार्मिक उपक्रमांना सुमारे १,२०० हून अधिक भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद (Morya Gosavi Samadhi) दिला.
पहाटेपासूनच मंदिर परिसरात “गणपती बाप्पा मोरया”च्या घोषणांनी प्रसन्नता पसरली होती. नितीन दैठणकर यांच्या चौघडा वादनाने दिवसाची सुरुवात झाली, तर गोंदवलेकर महाराज आरती मंडळाच्या सामूहिक आरतीने परिसर भक्तिभावाने दुमदुमला. त्यानंतर आयोजित मोरया गोसावी महाराज चरित्र पठणात भाविकांनी श्रद्धापूर्वक(Morya Gosavi Samadhi) सहभाग नोंदवला.
सकाळी ९ ते १२ या वेळेत वेदशास्त्र संपन्न चंद्रशेखर रबडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली मन्यसूक्त हवन पार पडले. सौ. भट आणि नारायण लांडगे यांनी केलेल्या श्रीसूक्त पठणामुळे परिसरात आध्यात्मिक शांततेचा( Morya Gosavi Samadhi)अनुभव लाभला.
स्व. अखिल शरद लुनावत यांच्या स्मरणार्थ निखिल लुनावत यांनी आरोग्य आणि दंत तपासणी शिबिर आयोजित केले होते, ज्याचा लाभ शंभरहून अधिक भक्तांनी (Morya Gosavi Samadhi) घेतला.
दुपारी महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला. त्यानंतर स्थानिक भजनी मंडळाने सादर केलेल्या भक्तिगीतांनी वातावरण प्रसन्न केले. संध्याकाळच्या सत्रात मानसी बडवे यांच्या भावपूर्ण कीर्तनामुळे उपस्थित श्रोत्यांमध्ये अध्यात्मिक(Morya Gosavi Samadhi)ऊर्जा संचारली.
सायंकाळी जेष्ठ पत्रकार आणि विचारवंत उदय निरगुडकर यांच्या ‘सध्याचा सामर्थ्यशाली भारत’ या विषयावरील व्याख्यानाला भाविकांची मोठी उपस्थिती लाभली. व्याख्यानापूर्वी पिंपरी-चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे मंदार महाराज देव, जितेंद्र देव आणि केशव विद्वास यांनी त्यांचा मान्यवर सत्कार (Morya Gosavi Samadhi) केला.
व्याख्यानात उदय निरगुडकर यांनी समाजातील चुकीच्या समजुती, व्यवसायावरील अविश्वास, बाहेरील गोष्टींचे अतीमूल्यांकन आणि भारतीय कर्तृत्वाकडे दुर्लक्ष होण्याबाबत स्पष्टपणे मुद्दे मांडले. जग पाहताना जागृत आणि सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक असल्याचे त्यांनी( Morya Gosavi Samadhi)सांगितले.
जनता राष्ट्राभिमानी आणि निश्चयी असेल तरच राष्ट्र महासत्ता बनते, समाजाची एकजूट राष्ट्राच्या सामर्थ्यात रूपांतरित होते, असे त्यांनी प्रतिपादन केले. ज्ञानाची साधने टिकवण्याचे महत्त्व अधोरेखित करताना भारताच्या गत ३५ वर्षांतील सॉफ्टवेअर एक्स्पोर्टने सौदी अरेबियाच्या क्रूड ऑईल एक्स्पोर्टलाही मागे टाकल्याची तथ्यपूर्ण नोंद त्यांनीMorya Gosavi Samadhi, केली.
अलेक्सा तयार करणारा वैज्ञानिक धैर्य दंड हा नाशिकचा सामान्य घरातील भारतीय असल्याचा उल्लेख करत आधुनिक भारतातील उत्कर्ष, नवोन्मेष आणि स्वाभिमानाची जाण त्यांनी श्रोत्यांना करून दिली.
आयोजकांच्या मते, अशा धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमुळे पिढ्यांमधील संवाद वाढतो, परंपरेचे संवर्धन होते आणि समाजात सकारात्मक ऊर्जा व आध्यात्मिक मूल्यांची जपणूक घडते. चिंचवडगावातील ही प्रेरणादायी परंपरा आगामी काळातही असाच उत्साह आणि भक्तिभाव जपत पुढे जावी, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.
Morya Mahotsav:मुग्धा, प्रथमेश जोडीची “मर्मबंधातली ठेव” मोरया भक्तांनी आपल्या ह्रदयाच्या मखमली पेटीत जतन करून ठेवली
मुग्धा, प्रथमेश जोडीची “मर्मबंधातली ठेव”मोरया भक्तांच्या काळजात वसली
महासाधू मोरया गोसावी यांच्या 464 व्या संजीवन समाधी सोहळा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित उत्सवात कालच्या दुसऱ्या दिवशी सारेगमप लिटल चॅम्प्स पहिल्या पर्वाची लाडकी जोडी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या जोडीने आपल्या मर्मबंधातली ठेव या संगीत रजनीच्या कार्यक्रमाने शब्दश: मंत्रमुग्ध( Morya Mahotsav) केले.
मानवी जीवनात काही वेळा कधी कधी अगदीच अनपेक्षित रित्या कळत नकळत एखाद्यावर जीव जडतो, इतका की तो/ती आपले कुणीही नसताना सुद्धा ते आपल्याला जणू रक्ताच्या नात्याइतकेच जवळचे (Morya Mahotsav) होतात.
असेच दोन नावे म्हणजे झी टीव्हीवरील सारेगमपच्या पहिल्या पर्वातल्या लिटल चॅम्प्स पंचरत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाडक्या गायकातले माऊ आणि लाडू म्हणून ओळखले जाणारे अलिबागची मुग्धा आणि रत्नागिरीचा प्रथमेश ही (Morya Mahotsav) जोडी.
त्या पाच जनातली सर्वात लहान म्हणून सर्वांची लाडकी झालेली आणि आपल्या गोड आवाजाने सर्वांची मुलगी झालेली मुग्धाने आपल्या बालपणीचा प्रथमेशदादा सोबत सप्तपदी चालण्याचा निर्णय घेतला आणि संगीतवेडा महाराष्ट्र या बातमीने मनापासून खुश झाला.लग्नानंतर प्रथमच चिंचवड मध्ये आलेल्या या जोडीला काल डोळेभरून पाहण्यासाठी आणि कानात त्यांचे दैवी सप्तसुरु साठवण्यासाठीकाल मोरया मंदिर परिसरात विक्रमी गर्दी झाली होती.संपूर्ण परिसर अक्षरशः पॅक झाला होता, आणि प्रत्येकाच्या डोळ्यात होते ते कुतूहल आणि कौतुक
त्या सगळ्यांना न्याय देताना या जोडीने आपल्या सुरेल गायनाने खरोखरचं मंत्रमुग्ध केले, खिळवून (Morya Mahotsav) ठेवले.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; br
आबालवृद्ध या कार्यक्रमात एकाच जागी शेवटच्या गाण्यापर्यंत बसून होते याहून अधिक योग्य वर्णन या कार्यक्रमाचे होऊच शकत नाही.
श्रीराम भजनाने सुरुवात झालेल्या या संगीत रजनीत या भजनाच्या अंतिम कडव्यात प्रथमेशने उपस्थित श्रोत्यांना ठेका धरायला लावला आणि हा सुर शेवटपर्यंत म्हणजेच अवघा रंग एक झाला या भैरवी (Morya Mahotsav) पर्यंत.
यात विशेष उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे या जोडीने एकही हिंदी गाणं घेतलं नाही, नवे गाणे नव्हते पण तरीही एकही श्रोता जाग्यावरून उठला नाही की वैतागला नाही.
प्रभो विघ्नहर्ता, तुज मागतो मी आता, जय शंकरा करुणाकरा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, सोहम हर डमरू बाजे, हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, काळ देहासी आला खाऊ अशा एकापेक्षा एक अजरामर गाण्यांची ही मैफिल रसिकांच्या मनात चिरकाल वसणार यात काहीच शंका (Morya Mahotsav)नाही.
याच मैफिलीतली एक विशेष बाब म्हणजे प्रथमेशने कन्नडी भजन राधास्वामी लक्ष्मीरमना हे भजन गायला सुरुवात केली आणि ही भाषा समजत नसताना देखील अनेक रसिकांनी मनापासून ताल धरला यातच एक चार पाच वर्षाची छोटूली मुलीने जो ठेका पकडला तो पाहून श्रोत्यासह सहभागी कलाकार सुद्धा चकित झाले, त्यामुळेच कदाचित आपल्या रसाळ पण प्रासंगिक अभ्यासू निवेदनाने रसिक श्रोत्यांना वेगळाच आनंद देणाऱ्या विघ्नेश जोशी या अभिनेत्या असणाऱ्या निवेदकाने आपल्याला मिळालेली मोरयाची महावस्त्र म्हणून मानाची मिळालेली शाल तिला सप्रेम देताच उपस्थित श्रोत्यांनी उभे राहून दाद देताच हा प्रसंग खरोखरचं अजरामर झाला.
या अवीट मैफिलीत चे निवेदन विघ्नेश जोशी यांनी यथार्थ करत आपली अवीट छाप पाडली.
तबल्यावर रुपक वझे हार्मोनियमवर स्वानंद कुलकर्णी,व्हायोलीनवर उदय गोखलेतर पखवाजाची साथ: प्रथमेश देवधर यांच्या सह ताल व टाळ याची साथ विश्वास कळमकर या सहकलाकारांनी अप्रतिमरित्या देत हा कार्यक्रम खूपच उंचीवर (Morya Mahotsav) नेला.
अशा मैफिली कधीच संपू नयेत असे भाबड्या मनाला वाटत असले तरी जे वाटते तेच होते असे नसते ना, त्यामुळेच ही मैफिल मनात साठवत श्रोते महोत्सव आयोजकांना मनोमन धन्यवाद देत घरी (Morya Mahotsav)परतले.
आजच्या या संगीत रजनीसाठी सुद्धा चिंचवड देवस्थान ट्रस्ट चे मुख्य विश्वस्त श्री मंदार महाराज देव विश्वस्त जितेंद्र देव, विश्वस्त केशव विद्वांस, विश्वस्त ॲड. देवराज डहाळे हे मुख्य पाहुणे आणि रसिक म्हणून तसेच यजमान म्हणून संपुर्ण वेळ कार्यक्रमात उपस्थित होते,त्यांच्याच हस्ते कलाकारांचा यथार्थ सन्मान केला गेला आणि रसिकांनी पुन्हा पुन्हा असे कार्यक्रम होत राहोत हेच मागणे मोरया चरणी मागितले असणार याबद्दल माझ्या मनात तरी (Morya Mahotsav)कसलीही शंका नाही.
विवेक कुलकर्णी
Sanjeevan Samadhi Mahotsav:श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात सामूहिक अथर्वशीर्ष पठण व पवनामाईची आरती
चिंचवड, ७ डिसेंबर -श्रीमन महासाधू मोरया गोसावी महाराज यांच्या 464 व्या समाधी संजीवन सोहळ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यकमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने श्रींची महापूजा, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, महासाधू मोरया गोसावी महाराज यांचे चरित्र पठण, नेत्र व दंत चिकित्सा शिबिर, यापुढे दर संकष्टी चतुर्थीला नित्यनेमाने होणारी पवनामाईची आरती या आगळ्यावेगळ्या पण अतिशय स्तुत्य आणि सामाजिक कार्याचा (Sanjeevan Samadhi Mahotsav) विशेष उल्लेख करता येईल.
गणेशभक्तांचे श्रद्धास्थान म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या महासाधू मोरया गोसावी महाराज यांच्या पावन स्पर्शाने ही भूमी अतिशय पावन झाल्याची भावना गणेशभक्तांमधे असते. आजच्या चतुर्थीच्या मुहूर्तावर रविवारची सुट्टी आल्याने मोरया भक्तांसाठी जणू ही (Sanjeevan Samadhi Mahotsav) पर्वणीच ठरली.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; br
मार्गशीर्ष मासातील शुभ संकष्टी चतुर्थी, रविवार दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी श्रीमन् महासाधु मोरया गोसावी महाराज यांच्या ४६४ व्या समाधी उत्सवानिमित्त देऊळ मळा, श्री मोरया गोसावी समाधी मंदिर, चिंचवडगाव येथे आयोजित सामुदायिक अथर्वशीर्ष पठण अत्यंत भक्तिमय, मंगलमय आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. या धार्मिक उपक्रमात सुमारे १,२०० भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून, यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुणांसह विद्यार्थ्यांचा सहभाग विशेषत्वाने उल्लेखनीय ठरला.
पहाटेपासूनच मंदिर परिसर “गणपती बाप्पा मोरया” या जयघोषाने दुमदुमून गेला होता. सकाळच्या शांत व पवित्र वातावरणात भाविकांनी एकत्र येऊन अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण केले. कार्यक्रमास मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर श्री दिलीप तांबोळकर यांचा शंखनाद व सामूहिक प्रार्थनेच्या पार्श्वभूमीवर पठणास सुरुवात झाली. सर्व भाविकांनी एकाच वेळी श्रद्धा व एकाग्रतेने केलेल्या पठणामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक शांतता, संयम आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव प्राप्त झाला.
या कार्यक्रमास समाजातील विविध स्तरांतील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली. विशेषतः विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग हा कार्यक्रमाचा महत्त्वाचा घटक ठरला. नव्या पिढीमध्ये धार्मिक व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी, या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. व्यासपीठावर ज्ञानप्रबोधिनी शाळा, माटे शाळा व क्रांतीवीर चापेकर शाळा यांचे विद्यार्थी व भार्गव आपटे (बालशाखा) असे बालचमू, श्रीमती प्रिया जोग, सौ. नेहा मोकाशी या सर्वांनी पडण्याची धुरा सांभाळली. मान्यवरांमध्ये श्री प्रविण कोठावदे, डॉ. अभय कुलकर्णी, श्री भास्कर रिकामे, श्री रविकांत कळंबकर तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ तील कार्यकारणी सदस्य, विविध भजनी मंडळे, अथर्वशीर्ष मंडळांचे प्रतिनिधी, तसेच गायत्री परिवाराचे श्री राजेंद्र देसले उपस्थित होते.
अथर्वशीर्ष पठणानंतर श्रीमन् मोरया गोसावी महाराजांची आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. या वेळी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने आणि भक्तिभावात पार पडल्यामुळे उपस्थित भाविकांमध्ये समाधानाची भावना दिसून आली.
या भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड देवस्थान ट्रस्ट, चिंचवड, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, संस्कृती संवर्धन व विकास महासंघ आणि भजनी मंडळ महासंघ व अथर्वशीर्ष मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. आयोजनात स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ व संस्कृती संवर्धन व विकास महासंघाची भूमिका विशेष महत्त्वाची ठरली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. आयोजकांनी उपस्थित सर्व भाविकांचे तसेच सहकार्य करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
अशा धार्मिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक उपक्रमांमुळे समाजातील संस्कृतीचे जतन व संवर्धन होते, परंपरेशी नव्या पिढीचा सुसंवाद निर्माण होतो आणि समाजात सकारात्मक ऊर्जा, सामाजिक सलोखा व आध्यात्मिक मूल्यांची जोपासना घडून येते, असे मत आयोजकांनी व्यक्त केले. चिंचवड नगरीत अशा प्रेरणादायी उपक्रमांची परंपरा अखंड सुरू राहावी, हीच भाविकांची सामूहिक भावना होती.
“https://youtu.be/sW_hFqzfsSU?si=u0lef64c7YolNczI” align=”center” width=”” /]
प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड येथील जेष्ठ साहित्यिक राजेंद्र घावटे यांच्या पत्नी सौ.जयश्रीताई घावटे यांचे आज पहाटे ५.०० वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी (Sad Demise (त्यांचे वय 58 वर्षे होते
मागील काही काळापासून त्या कॅन्सर सोबत झुंजत होत्या मात्र काल पहाटे ही झुंज (Sad Demise (अपयशी ठरली.
त्या स्वतःही एक उत्तम कवयत्री होत्या, त्या शिक्षिका होत्या त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून, मुलगी जावई आणि नातु असा परिवार आहे आपल्या गोड स्वभावाने त्यांनी अनेक माणसे जोडली होती त्यांच्या अकाली जाण्याने हळहळ( Sad Demise ) व्यक्त होत आहे
Morya Gosavi Mahotsav:हिंदू मंदिर परिसरातील जमिनीवरील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करा — मंत्री नितेश राणे
प्रतिनिधी :हिंदू मंदिरांच्या जमिनी व परिसरातील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हे पावित्र्यावर आघात असून दोन समाजांत तणाव निर्माण करण्याचे कारण ठरू शकते. त्यामुळे अशा अतिक्रमणांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट (Morya Gosavi Mahotsav)केले.
चिंचवड येथे श्रीमन महासाधू मोरया गोसावी महाराजांच्या 464 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे अध्यक्षस्थानी होते. आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे तसेच विविध मान्यवरांची (Morya Gosavi Mahotsav)उपस्थिती होती.
राणे म्हणाले की, हिंदू समाजाने दाखवलेला विश्वास हेच कार्य करण्याचे बळ आहे. धार्मिक स्थळांचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून अतिक्रमणासारख्या गंभीर मुद्द्यांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. मोरया स्थानाचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, तसेच समाजातील शांतता, सद्भाव आणि धार्मिक समभाव यांचे रक्षण करण्यासाठी पवित्र स्थळांचे संवर्धन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद (Morya Gosavi Mahotsav)केले.
कार्यक्रमात चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव यांनी सोहळ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडली. संजीवन समाधीची परंपरा, पवना नदीकाठी समाधीस्थळाची निवड यामागील आध्यात्मिक महत्त्व आणि सोहळ्यातील विविध धार्मिक उपक्रमांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. पवना नदी संवर्धनासाठी समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता (Morya Gosavi Mahotsav)त्यांनी मांडली.

आमदार शंकर जगताप यांनी देवस्थानच्या काही महत्त्वपूर्ण मागण्या शासनाकडे प्रलंबित असल्याचे सांगत त्या पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली. खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनीही धार्मिक स्थळांच्या संवर्धनात समाजाच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित(Morya Gosavi Mahotsav) केले.
कार्यक्रमाच्या शेवटी केशव विद्वांस यांनी आभार मानले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी (Morya Gosavi Mahotsav)यांनी केले.
Namaskar Mahotsav:नमस्कार महोत्सवात हास्य–नाट्य–संगीताची धमाल; ‘हास्यजत्रा’ व ‘करून गेलो गाव’ला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद
प्रतिनिधी:नमस्कारफाउंडेशनतर्फे आयोजित पाच दिवसीय नि:शुल्क ‘नमस्कार महोत्सव २०२५’ मध्ये सलग दोन दिवस प्रेक्षकांनी हास्य, नाट्य, संगीत आणि कलेची पर्वणी अनुभवली. महापौर निवासस्थान मैदान, निगडी प्राधिकरण येथे सुरू असलेल्या या महोत्सवात गुरुवार आणि शुक्रवारचे कार्यक्रम प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त गर्दीत (Namaskar Mahotsav ) रंगले.
गुरुवार, ०४ डिसेंबर रोजी, शरद जाधव प्रस्तुत एकपात्री कार्यक्रम ‘हास्यजत्रा’ ने उपस्थितांना अक्षरशः खिळवून ठेवले. एस.टी. स्टॅण्डवरील गंमतीजमती, ‘पांडातात्या’ या इरसाल राजकारण्याचे कारनामे, सरपंचीण रखमाबाईचा गावरान ठसका, ग्रामीण तरुणांचा वाढता लग्नप्रश्न, मुलगी पाहणीतील विनोद, महिलांची दागिन्यांची हौस आणि निर्मलग्राम योजनेतील फसणाऱ्या गोष्टी—या सर्वांची अनुभूती देताना जाधव यांनी हास्याच्या माध्यमातून माणुसकीचा अंतर्मुख करणारा संदेशही दिला. ठसकेबाज विनोदात नकळत येणाऱ्या वास्तवाने अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या (Namaskar Mahotsav)कडा भरून आल्या.

यापूर्वी ऑर्केस्ट्रा मिलेनियम स्टार या संगीतवृंदाने “कजरा मोहब्बतवाला…”, “एक नंबर तुझी कंबर…”, “झिंग झिंग झिंगाट…”सह जुन्या-नव्यांच्या सुरेल गाण्यांचे सादरीकरण करत प्रेक्षकांची मने जिंकली. ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा तालावर थिरकणारा सहभाग विशेष ठरला. प्रियंका पांडे यांनी सादर केलेल्या लावणीने सभागृहात टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा जल्लोष (Namaskar Mahotsav)उसळला.
कार्यक्रमादरम्यान समाजकार्य करणाऱ्या सलीम शिकलगार, सरिता साने आणि नमस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास जोशी यांनी कलाकारांचा सत्कार केला. सूत्रसंचालन प्रियंका आचार्य (Namaskar Mahotsav)यांनी केले.
दरम्यान, ०३ डिसेंबर रोजी महोत्सवाचे उद्घाटन माजी उपमहापौर शैलजा मोरे, सलीम शिकलगार यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी नमस्कार फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांची, विशेषत: कोविड काळातील ‘रोटी बँक’ उपक्रमाची माहिती देण्यात आली. शब्दरंग कला–साहित्य कट्टा संस्थेच्या ज्येष्ठ कलाकारांनी ‘इंद्रधनू’ कार्यक्रमातून विविध कलांची प्रस्तुती सादर केली.
करून गेलो गाव’ विनोदी नाटकानं उडवला हशांचा फव्वारा
शुक्रवार, ०५ डिसेंबर रोजी, राहुल भंडारे आणि महेश मांजरेकर निर्मित, राजेश देशपांडे लिखित-दिग्दर्शित दोन अंकी ‘करून गेलो गाव’ या विनोदी नाटकाने महोत्सवाला आणखी रंगत आणली. मालवणी बोलीची चटपटीत शैली, द्वयर्थी संवाद आणि कलाकारांचे अचूक टायमिंग यांनी प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट केले.
सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते भाऊ कदम (अण्णा) यांनी नाटकाचा केंद्रबिंदू ठरवत उपस्थितांना क्षणभरही उसंत दिली नाही. त्यांना ओंकार भोजने, उषा साटम, नुपूर दुडवडकर, अनुष्का बोऱ्हाडे, सौरभ गुजले, प्रणव जोशी, सुमीत सावंत, दीपक लांजेकर आणि सचिन शिंदे यांची समर्थ साथ लाभली.
वेडगाव बुद्रूक या काल्पनिक गावात ग्रामस्थ नाटक बसवण्यासाठी तयारी करतात; पण स्थानिक आमदार बकुळा या नर्तकीचा कार्यक्रम करण्याची हटवादी मागणी करतो—या कथानकाभोवती उलगडणारे प्रसंग, वेगवान हालचाली, आकर्षक नेपथ्य आणि नृत्यसूरांनी नाटकाला विशेष उंची मिळाली.
मध्यांतरात नमस्कार महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राज अहेरराव यांनी केले.
सांस्कृतिक वैभवाचा उत्सव
नमस्कार फाउंडेशनचा ‘नमस्कार महोत्सव २०२५’ संगीत, हास्य, नाट्य, कला यांचा संगम ठरला असून, समाजाचे शारीरिक-मानसिक-सांस्कृतिक आरोग्य सुदृढ करण्याचा उद्देश पुन्हा एकदा या महोत्सवाने अधोरेखित केला. सलग दोन दिवस प्रेक्षकांच्या आनंद, हास्य आणि मनमोकळ्या सहभागाने संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण रंगत गेले.
Discipline Value:शिस्त, संस्कार आणि हरवलेली नाळ: बदलत्या पिढीचे वास्तव आणि पालकांची जबाबदारी
(विवेक कुलकर्णी )काळ बदलतोय…घरं मोठी होत आहेत, पण मनातील उब कमी होत चालली आहे.सुविधा वाढत आहेत, पण मूल्यांचा पाया ढासळत आहे.मुलं अधिक बुद्धिमान झाली आहेत, पण मनाची स्थिरता, संवेदनशीलता आणि आदराची जाणीव मात्र क्षीण होताना (Discipline Value)दिसते.
स्मार्टफोन हातात असला तरी आयुष्याचे खरे धडे—प्रेम, संयम, अनुशासन आणि संस्कार—हे त्यांच्या मनापर्यंत पोहोचत नाहीत. आणि यासाठी संपूर्ण दोष मुलांवर टाकण्याऐवजी, आपल्यालाच थांबून आत्मपरीक्षण करावे(Discipline Value ) लागेल.
घराची शाळा — जिथे मूल घडते
मुलांचे पहिले शिक्षक म्हणजे आई-वडील.पहिले शब्द, पहिली चाल, पहिली सवय—हे सर्व घरातच आकार घेतात.पण आज काही पालकांना मुलांना “हो” म्हणणे सोपे वाटते, आणि “नाही” म्हणण्याची भीती वाटते. नकार दिला तर ते रागावतील, आपल्यापासून दूर जातील अशी भीती मनात घर करून बसली आहे.खरं म्हणजे मुलांना पालकांपासून दूर नेणारी गोष्ट म्हणजे निर्बंध नव्हे, तर( Discipline Value)दिशाहीन स्वातंत्र्य.अति लाड मुलांना विस्कटतात, अति सवलती स्वैर करतात, आणि अति माया त्यांना मनाने कमकुवत बनवते. प्रेमातही मर्यादा असल्या तरच ते नातं टिकतं.शाळा — जिथे मुलं माणूस बनतातशिक्षक हे मुलांचे दुसरे पालक.त्यांच्या फटकारण्यात प्रेम असते, कठोरतेत भविष्यासाठीची चिंता दडलेली असते.शाळा म्हणजे फक्त अक्षरे शिकण्याची जागा नव्हे, तर वर्तन, शिस्त, मर्यादा, सामाजिक भान आणि आत्मविश्वासाची पहिली प्रयोगशाळा आहे.पण आज शिक्षकांना दटावण्याचा, चूक थांबवण्याचा अधिकार कमी होत चालला आहे.मुलांच्या चुका पाहण्यापेक्षा शिक्षकांच्या प्रयत्नांवर बोट ठेवणाऱ्यांची संख्या वाढली आहे.गुरूंचा मान कमी झाला की ज्ञानाची किंमत आपोआप कमी (Discipline Value)होते.
हरवलेले बालपण
मोबाईलची स्क्रीन खेळण्यांची जागा घेत आहे.रात्रभर जागणं, सकाळी उठण्याची अनास्था, जबाबदारीकडे दुर्लक्ष, मोठ्यांचं ऐकायला नको—हे दृश्य आता सर्वत्र सर्वसाधारण झालं आहे.जे वय मैत्री, खेळ आणि मुक्त विचारांचं आहे, ते वय स्पर्धा, फॅशन, ट्रेंड आणि सोशल मीडियाने ग्रासले आहे.प्रश्न विचारण्याऐवजी रागावणं, सल्ला स्वीकारण्याऐवजी विरोध करणं—ही नवीन पिढीची वेदनादायक(Discipline Value) वास्तविकता आहे.समाज — जो शेवटी आरसा दाखवतोपहिली चूक माफ होते,दुसरी चूक सहन होते,पण तिसरी चूक आयुष्याची वाटच बदलून टाकते.घरात शिकवली नाही ती शिस्त,जग शिकवते तेव्हा त्याची किंमत फार मोठी असते.समाज समजावतो तेव्हा उशीर झालेला असतो,कायदा शिकवतो तेव्हा वेदना झालेल्या असतात.मुलं अचानक बिघडत नाहीत;ती हळूहळू हातातून निसटत जातात…आणि कधी लक्षात येतं कीरोखण्यासाठी आपणच खूप उशीर केला.
आता जागं होण्याची वेळशि स्त म्हणजे तिरस्कार नाही.शिक्षा म्हणजे सूड नाही.कडकपणा म्हणजे क्रौर्य नाही.ही मुलांच्या भविष्यासाठीची संरक्षण कवचं (Discipline Value)आहेत.
आज आपण त्यांना मार्गदर्शन केलं,तर उद्या ते मजबूत उभे राहतील.आज त्यांना मर्यादा शिकवल्या,तर उद्या त्यांनी स्वतःचे मूल्य जपतील.आज त्यांना आदर शिकवला,तर उद्या ते खऱ्या अर्थाने माणूस बनतील.मुलांचे भविष्य आपणच(Discipline Value) घडवायचे आहे.
त्यांच्या आयुष्याची पहिली ओळ आपणच लिहायची आहे.आज आपण बदललो,तर उद्या त्यांना बदलण्याची वेळ येणारच नाही.
