Home आरोग्य Garbage Depot Accident:मोशी कचरा डेपो दुर्घटना: नऊ मृत्यू, व्यवस्थेचा निष्काळजीपणा आणि समाजाला हादरवणारा प्रश्न

Garbage Depot Accident:मोशी कचरा डेपो दुर्घटना: नऊ मृत्यू, व्यवस्थेचा निष्काळजीपणा आणि समाजाला हादरवणारा प्रश्न

मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नऊ निष्पाप जीव गेले. प्रशासनाची जबाबदारी, समाजाची संवेदनशीलता आणि व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारा हृदयस्पर्शी लेख.

by Admin
Spread the love

(विशेष संपादकीय )मोशीची दुर्घटना… की आपल्या संवेदनांचा अंत?

“ढिम्म प्रशासन, मुर्दाड जनता आणि हिनकस राजकारण एकत्र आले की समाजाचा ऱ्हास अटळ (Garbage Depot Accident)असतो…”

 

व्हॉट्सअॅपवर कधीतरी वाचलेलं हे वाक्य तेव्हा एक साधा फॉरवर्ड वाटलं होतं. पण आज मोशीच्या कचरा डेपोतील भीषण दुर्घटनेनंतर ते वाक्य अक्षरशः वास्तव बनून समोर उभं ठाकलं (Garbage Depot Accident)आहे.

 

पिंपरी-चिंचवड… उद्योगनगरी… स्मार्ट सिटी… विकासाच्या गप्पा… कोट्यवधींची कामं… आधुनिकतेच्या घोषणा… आणि त्याच शहरात कचऱ्याचा डोंगर कोसळतो. काही क्षणांत नऊ निष्पाप जीव कायमचे गाडले जातात. हे फक्त निसर्गाचं संकट नव्हतं; ही माणसांनी निर्माण केलेल्या निष्काळजीपणाची शोकांतिका (Garbage Depot Accident)होती.

 

आज त्या नऊ घरांत चूल पेटेल… पण घास गळ्याखाली उतरणार नाही. कुठेतरी एखादं मूल अजूनही दाराकडे पाहत असेल. त्याला अजूनही वाटत असेल, “बाबा कामावर गेलेत… आता येतील.” पण त्याला कोण सांगणार की त्याचे बाबा आता कधीच परत येणार नाहीत? एखाद्या आईचा आधार गेला, एखाद्या पत्नीचं संपूर्ण आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं, एखाद्या वृद्ध आई-वडिलांच्या म्हातारपणाची काठी तुटली. ही केवळ नऊ मृत्यूंची संख्या नाही; ही नऊ कुटुंबांच्या भवितव्याची राख (Garbage Depot Accident)आहे.

 

सरकार नुकसानभरपाई जाहीर करेल. कदाचित कुटुंबातील एखाद्याला नोकरीही मिळेल. मदतीचे धनादेश वाटले जातील. पण एक प्रश्न कोण उत्तर (Garbage Depot Accident)देणार?

 

एखाद्या माणसाच्या आयुष्याची किंमत काही लाख रुपयांत मोजता येते का?

 

एका मुलाच्या डोक्यावरून फिरणारा बापाचा हात परत आणणारी कोणती नुकसानभरपाई आहे? पत्नीच्या आयुष्यात पुन्हा तेच हसू फुलवणारी कोणती योजना आहे? वृद्ध आईच्या कुशीत मुलगा परत देणारा कोणता सरकारी आदेश(Garbage Depot Accident) आहे?

 

उत्तर एकच आहे… नाही.

 

मग अशा घटना घडल्यावरच प्रशासन जागं का होतं? दुर्घटना झाल्यानंतर यंत्रणा धावते, पंचनामे होतात, चौकशी समित्या बसतात, जबाबदारी निश्चित करण्याच्या घोषणा होतात. पण दुर्घटना होण्याआधी काय(Garbage Depot Accident) झालं?

 

कचऱ्याचा तो डोंगर एका दिवसात उभा राहिला नव्हता. तो दिवसेंदिवस वाढत होता. त्याची उंची वाढत होती. धोका वाढत होता. मग त्या धोक्याची जाणीव कोणाला झाली नाही? तज्ज्ञांचे अहवाल कुठे गेले? सुरक्षा तपासण्या झाल्या का? आपत्कालीन आराखडे होते का? की सर्व काही फक्त फाईलपुरतंच मर्यादित(Garbage Depot Accident) होतं?

 

जर हे सगळं माहिती असूनही योग्य उपाययोजना झाल्या नसतील, तर ही केवळ निष्काळजीपणा नाही… ही माणसांच्या जीवाशी केलेली बेपर्वाई (Garbage Depot Accident)आहे.

सर्वात जास्त वेदना एका वेगळ्याच गोष्टीची होते. आपण समाज म्हणून इतके संवेदनाहीन कधी झालो? सकाळी ही बातमी वाचायची, दुपारी सोशल मीडियावर दोन ओळी लिहायच्या, संध्याकाळी “भावपूर्ण श्रद्धांजली” पोस्ट करायची… आणि दुसऱ्या दिवशी सगळं विसरून (Garbage Depot Accident)जायचं.

 

आपल्याला नऊ मृत्यू हादरवत नाहीत, पण एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर ट्रेंडिंग झाला की हजारो प्रतिक्रिया येतात. एखादा क्रिकेट सामना हरला की तासन्तास चर्चा होते. पण नऊ कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, यावर समाजाचं मौन अधिक भयानक (Garbage Depot Accident)वाटतं.

 

आज प्रत्येक राजकीय पक्ष पत्रकार परिषद घेईल. आरोप-प्रत्यारोप होतील. निवेदने दिली जातील. काही दिवस बातम्या झळकतील. मग हा विषयही हळूहळू शांत होईल. पण त्या नऊ चितांमधून उठणारा धूर मात्र एकच प्रश्न विचारत(Garbage Depot Accident) राहील…

 

आमचा गुन्हा काय होता?

 

या दुर्घटनेत मृत्यू पावलेले लोक कोणतेही व्हीआयपी नव्हते. ते सामान्य नागरिक होते. रोज कष्ट करून आपल्या कुटुंबासाठी दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था करणारे. कदाचित त्यांच्या स्वप्नात मोठं घर नसेल, महागडी गाडी नसेल; पण आपल्या मुलांना शिकवायचं, त्यांचं भविष्य घडवायचं, एवढीच त्यांची महत्त्वाकांक्षा असेल. त्या स्वप्नांवर आज कचऱ्याचा डोंगर कोसळला(Garbage Depot Accident) आहे.

 

एका कुटुंबातील कमावता माणूस गेला म्हणजे फक्त एक व्यक्ती मरत नाही; त्या घराची स्वप्नं मरतात, मुलांचं शिक्षण अर्धवट राहतं, वृद्ध आई-वडिलांचा आधार संपतो आणि अनेकदा त्या कुटुंबाचा आत्मविश्वासही संपतो. या वेदनेचं मोजमाप कोणत्या आकड्यांत (Garbage Depot Accident)करायचं?

 

मला या घटनेने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली… दुर्घटना कधीच अचानक घडत नाहीत; त्या वर्षानुवर्षे चाललेल्या दुर्लक्षाची परिणती असतात. त्या आधी असंख्य संधी असतात—धोका ओळखण्याच्या, उपाय करण्याच्या, जीव वाचवण्याच्या. पण जेव्हा जबाबदाऱ्या झटकल्या जातात, तेव्हा शेवटी माणसांचे जीव(Garbage Depot Accident) जातात.

 

उद्या या नऊ नागरिकांची नावं वर्तमानपत्राच्या जुन्या कात्रणांत हरवून जातील. चौकशी अहवाल एखाद्या कपाटात धूळ खात पडेल. राजकीय भाषणांमध्ये नवीन मुद्दे येतील. सोशल मीडियावर नवीन ट्रेंड सुरू होतील. पण ज्या मुलाच्या डोक्यावरून बापाचा हात निघून गेला, ज्या आईच्या कुशीतला मुलगा कायमचा हरवला, ज्या पत्नीच्या संसाराचा आधारच निघून गेला… त्यांच्यासाठी ही दुर्घटना कधीच ‘जुनी बातमी’ होणार नाही. त्यांच्या आयुष्याच्या कॅलेंडरवर वेळ कायमची थांबलेली असेल—त्या काळ्याकुट्ट दिवशी… ज्या दिवशी कचऱ्याचा डोंगर कोसळला नव्हता, तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याचाच डोंगर कोसळला (Garbage Depot Accident)होता.

 

आज फक्त श्रद्धांजली वाहून आपलं कर्तव्य संपत नाही. या नऊ नागरिकांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, तर दोषींना शिक्षा झाली पाहिजे. जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. अशा दुर्घटना पुन्हा होणार नाहीत, याची ठोस हमी मिळाली (Garbage Depot Accident)पाहिजे.

 

कारण…ज्या समाजात प्रश्न विचारणारे संपतात, त्या समाजात दुर्घटना कधीच संपत (Garbage Depot Accident)नाहीत.

 

मोशी आज रडत आहे. पिंपरी-चिंचवड सुन्न झालं आहे. माझ्यासारख्या असंख्य नागरिकांच्या मनात एकच अस्वस्थ करणारा प्रश्न घोंगावत (Garbage Depot Accident)आहे…

 

आज कचऱ्याचा डोंगर नऊ जणांवर कोसळला… उद्या तो कोणावर (Garbage Depot Accident)कोसळणार?

 

जर या दुर्घटनेनंतरही व्यवस्था बदलली नाही, तर भविष्यात होणाऱ्या प्रत्येक अशाच मृत्यूत केवळ कचऱ्याचा डोंगर दोषी नसेल… आपलं मौन, आपली उदासीनता आणि जबाबदारी टाळणारी व्यवस्था देखील तितकीच दोषी (Garbage Depot Accident)असेल.

 

आणि म्हणूनच…श्रद्धांजली फुलांनी नव्हे, तर जबाबदारी निश्चित झाल्यावरच खरी ठरते. न्याय मिळाल्यावरच मृतात्म्यांना खरी शांती मिळते. अन्यथा प्रत्येक अपघातानंतर आपण फक्त मृतांचा आकडा मोजत राहू… आणि व्यवस्था पुढच्या बळीची वाट पाहत (Garbage Depot Accident)राहील.

 

मोशीतील त्या नऊ निष्पाप जीवांना भावपूर्ण (Garbage Depot Accident)श्रद्धांजली…!

 

— विवेक कुलकर्णी

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00