Home आरोग्य Jadhavwadi Dam :जाधववाडी लघुपाटबंधारे तलाव भरला; इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Jadhavwadi Dam :जाधववाडी लघुपाटबंधारे तलाव भरला; इंद्रायणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जाधववाडी लघुपाटबंधारे तलाव १००% भरण्याच्या मार्गावर. इंद्रायणी नदीत अनियंत्रित पाणीविसर्गाची शक्यता; देहू, आळंदीसह नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

by Admin
Spread the love

पिंपरी, प्रतिनिधी :दि. ६ जुलै २०२६):सद्यस्थितीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच धरण क्षेत्रातील पाण्याची आवक वाढल्याने जाधववाडी लघुपाटबंधारे तलाव कोणत्याही क्षणी १०० टक्के भरून त्यातून अनियंत्रित पाणीविसर्ग सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली (Jadhavwadi Dam)आहे.

 

त्यामुळे सुधा नदी व इंद्रायणी नदीच्या पात्रालगतच्या सर्व नागरिकांनी तातडीने सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले (Jadhavwadi Dam)आहे.

 

विशेषतः जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, देहू, आळंदी ते तुळापूर या नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे. तसेच नदीपात्रात किंवा नदीकाठावर असलेले जनावरे, शेतीसाहित्य व इतर मौल्यवान वस्तू तात्काळ सुरक्षित ठिकाणी (Jadhavwadi Dam)हलवाव्यात.

 

आषाढी वारीनिमित्त देहू व आळंदी येथे आलेल्या भाविक वारकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये, असे विशेष आवाहन करण्यात आले(Jadhavwadi Dam) आहे.

 

तसेच संबंधित ग्रामपंचायती, नगरपालिकां व महापालिकांना इंद्रायणी नदीतील संभाव्य अनियंत्रित पाणीविसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या (Jadhavwadi Dam)आहेत.

 

– दिगंबर डुबल

कार्यकारी अभियंता

पुणे पाटबंधारे विभाग, (Jadhavwadi Dam)पुणे

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00