Home माझं पिंपरी चिंचवड Protest Marathi Journalists:संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याविरोधात पत्रकारांचा एल्गार; कारवाई न झाल्यास बहिष्काराचा इशारा

Protest Marathi Journalists:संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याविरोधात पत्रकारांचा एल्गार; कारवाई न झाल्यास बहिष्काराचा इशारा

प्रश्न विचारणे गुन्हा असेल, तर हो... आम्ही गुन्हेगार!" खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याविरोधात पत्रकारांचा एल्गार; कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या बातम्यांवर बहिष्काराचा इशारा

by Admin
Spread the love

(चिंचवड,प्रतिनिधी दि. २६ जून) : पत्रकारांना धमकीची भाषा वापरत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार संघाने शुक्रवारी चिंचवडमध्ये तीव्र आंदोलन केले. केवळ माफी मागून हा विषय संपणार नाही, संबंधित खासदारावर पक्षाने तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, अन्यथा राज्यभर शिवसेना पक्ष आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या बातम्यांवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात ( Protest Marathi Journalists)आला.

 

शुक्रवारी सायंकाळी चिंचवड येथील के.एस.बी. चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. प्रारंभी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांनी निषेधाच्या घोषणा देत रस्त्यालगत निदर्शने( Protest Marathi Journalists) केली.

 

पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही”

 

यावेळी मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांवरील आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. “पत्रकारांचा अपमान आणि धमकीची भाषा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. सत्तेचा माज आलेल्या लोकप्रतिनिधींना लोकशाहीची जाणीव करून देण्यासाठी पत्रकार एकजुटीने लढतील,” अशी भूमिका संघटनेने स्पष्ट ( Protest Marathi Journalists)केली.

 

खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “प्रश्न विचारणे गुन्हा असेल, तर हो… आम्ही पत्रकार गुन्हेगार आहोत!” या आशयाचे फलक आंदोलनस्थळी झळकत( Protest Marathi Journalists) होते.

 

राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

 

मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, पुणे जिल्हाध्यक्ष संजय मराठे, तसेच विकास साळवे आणि संगीता पाचंगे यांनी मनोगत व्यक्त करताना खासदारांच्या वक्तव्याचा निषेध ( Protest Marathi Journalists)केला.

 

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दबाव आणण्याचा किंवा पत्रकारांना धमकावण्याचा कोणताही प्रयत्न हा थेट लोकशाहीवरील हल्ला आहे. पत्रकार प्रश्न विचारणे थांबवणार नाहीत. पक्षाने संबंधित खासदारावर कारवाई केली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारले ( Protest Marathi Journalists)जाईल.”

 

या आंदोलनात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले( Protest Marathi Journalists) होते.

 

यावेळी विवेक कुलकर्णी, बजरंग मासाळ, संतोष महामुनी, रोहित खर्गे, नागेश खजुर्गीकर, पराग डिंगणकर, उमेश सणस, तौफीक सय्यद, गजाला सय्यद, आसीया इनामदार, उमेश पाटील, जगदीश बच्छाव यांच्यासह मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य आणि पत्रकार बांधव उपस्थित ( Protest Marathi Journalists)होते.

 

आंदोलनाच्या शेवटी मराठी पत्रकार संघाने स्पष्ट इशारा दिला की, खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पक्षाकडून योग्य ती शिस्तभंगाची कारवाई न झाल्यास राज्यभर शिवसेना पक्ष आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या बातम्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात ( Protest Marathi Journalists) येईल.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00