(पिंपरी, २७ ऑगस्ट ): पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (सीओईपी) प्रशासनाने एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधात केलेली तक्रार चुकीची असून ती तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सीओईपीच्या कुलगुरूंना संघाच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदन (Marathi Journalists Association)दिले.
पत्रकारांनी संस्थेच्या चांगल्या उपक्रमांना प्रसिद्धी देतानाच विद्यार्थ्यांच्या समस्या आणि प्रशासनाच्या त्रुटीही समाजासमोर मांडणे अपेक्षित आहे. गोंजारी यांनी सीओईपीमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना व प्रश्न बातमीच्या माध्यमातून मांडले आहेत. त्याची दखल घेऊन समस्या सोडविण्याऐवजी पत्रकाराविरोधात तक्रार करणे योग्य नाही, असे निवेदनात म्हटले (Marathi Journalists Association)आहे.
गोंजारी हे ज्येष्ठ व सुसंस्कृत पत्रकार असून अनेक वर्षांपासून पुण्यात तटस्थपणे पत्रकारिता करीत आहेत. विद्यार्थ्यांनी धाडसाने मांडलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात येणार असल्याचेही निवेदनात नमूद केले (Marathi Journalists Association)आहे.
सीओईपी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत आणि गोंजारी यांच्याविरोधातील तक्रार मागे घ्यावी, अशी मागणी संघाने केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास प्रामाणिक पत्रकारितेच्या समर्थनार्थ कॉलेज प्रशासनाविरोधात राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला (Marathi Journalists Association)आहे.


