Home माझं पिंपरी चिंचवड Marathi Sahitya Sammelan:पुण्यात ८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

Marathi Sahitya Sammelan:पुण्यात ८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

राज्यस्तरीय पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन आणि कवी संमेलनाने रंगली साहित्यिक मैफल

by Admin
Spread the love

पुणे, दि. १० मे २०२६ : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद संचलित कला गोविंद शिक्षण प्रसारक मंडळ आणि पोलिस मित्रसंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उरळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या रविंद्र कला मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. संमेलनात पुस्तक प्रकाशन, राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि निमंत्रित कवींच्या बहारदार कवी संमेलनाचा समावेश (Marathi Sahitya Sammelan) होता.

 

या साहित्य संमेलनाचे संयोजक व निमंत्रक प्रा. सुरेश वाळेकर आणि किशोर केदारी होते. संमेलनाध्यक्ष म्हणून राष्ट्रपती पोलिस पदक मानकरी लोककवी सीताराम नरके उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. शैलेंद्र भनगे, के. डी. बापू कांचन, सूर्यकांत नामगुडे, ज्येष्ठ कवी लक्ष्मण शिंदे, किशोर टिळेकर, किशोर केदारी आदी मान्यवर उपस्थित (Marathi Sahitya Sammelan)होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत प्रशिक्षक शिवराज साने आणि त्यांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वागत गीत, पोवाडा आणि गवळण यांसारख्या विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने (Marathi Sahitya Sammelan)जिंकली.

 

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा मान्यवरांना यावेळी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल साने संगीत विद्यालयाचे संस्थापक शिवराज साने यांना “संगीत रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच आळंदी येथील ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विजय गुळवे यांना “आदर्श संस्थापक अध्यक्ष” पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय गव्हाणे पाटील यांना सामाजिक, शैक्षणिक आणि ग्रामविकास क्षेत्रातील कार्याबद्दल “राज्यस्तरीय आदर्श सरपंच” हा मानाचा पुरस्कार देण्यात (Marathi Sahitya Sammelan)आला.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या तब्बल ६५ निमंत्रित कवींनी विविध विषयांवरील स्वरचित कविता सादर करत साहित्यरसिकांना मंत्रमुग्ध केले. कवी-गायक प्रवीण बोरसे यांनी “खाली हाताने आलास एकटा, खाली हाताने जाणार एकटा…” ही जीवनावर आधारित भावस्पर्शी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. ज्येष्ठ कवी किशोर केदारी यांनी “आई” ही कविता आपल्या दमदार आवाजात सादर केली, तर कवी-गीतकार सतीश कांबळे यांनी सादर केलेली “टरबुज लय लय गोड” ही कविता रसिकांच्या विशेष पसंतीस (Marathi Sahitya Sammelan) उतरली.

 

ज्येष्ठ कवी डॉ. जयद्रथ आखाडे यांनी दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कवितेच्या माध्यमातून अनोख्या शैलीत गौरव केला. याशिवाय प्रमोद सूर्यवंशी, योगिता कोठेकर, दिनेश खैरे, प्रकाश मुळे, अनिता भोसले, सुवर्णा वाघमारे, खलील शेख, उज्वला यादव, पूनम सावंत, वंदना चौधरी, सुनीता चव्हाण, वनिता जाधव, अरुण घोडके, सुवर्णा पवार, शैलेंद्र भनगे, प्रमिला कुलकर्णी, जयश्री सोनवणे, महादेव लांडगे, रूपाली पाटील, वैशाली सोनवणे, अमित घुले आदी कवींनीही आपल्या रचनांनी साहित्यिक मैफिल (Marathi Sahitya Sammelan) रंगवली.

 

संमेलनाचे प्रास्ताविक प्रा. सुरेश वाळेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशीव आणि ॲड. उमाकांत आदमाने यांनी (Marathi Sahitya Sammelan)केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00