पिंपरी, दि. १२ मे २०२६ : “’आनंदाचा बटवा’ या काव्यसंग्रहातून वाचकांनी आनंद घ्यावा आणि तो इतरांपर्यंत पोहोचवत समाजाचे ऋण फेडत समाधानाकडे वाटचाल करावी,” असे प्रतिपादन डॉ. संजय जगताप यांनी केले. चिंचवड येथील सायन्स पार्कच्या तारांगण सभागृहात कवी संजय होनकळस लिखित आणि काव्यमित्र संस्थेतर्फे आयोजित ‘आनंदाचा बटवा’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत (Anandacha Batwa)होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील, संत एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज ह.भ.प. डॉ. पुष्करमहाराज गोसावी तसेच कवी संजय होनकळस उपस्थित होते. यावेळी कवी, साहित्यिक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि रसिकांनी सभागृहात मोठी उपस्थिती (Anandacha Batwa)दर्शवली.
डॉ. संजय जगताप पुढे म्हणाले की, “आनंदाच्या वाटा, आनंदाचे जिन्नस, योग दिवस, बालभारती, ग्रंथालय, सराव, पुस्तक, संमेलन, कलाकार, कलेचे ऋण, संगीत, शब्दार्थ, पर्यटन, कोकण, सौभाग्यवती, स्त्रीशक्ती, ईश्वरानुभूती आणि साक्षात्कार अशा विविध विषयांवरील कवितांनी ‘आनंदाचा बटवा’ समृद्ध झाला असून हा काव्यसंग्रह आबालवृद्धांना आनंद देणारा(Anandacha Batwa) ठरेल.”
इतर मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून साहित्य, समाजकार्य आणि संस्कारमूल्ये जपणाऱ्या उपक्रमांची आजच्या काळात नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून युवा पिढीने वाचनसंस्कृती जोपासावी, असे आवाहनही त्यांनी(Anandacha Batwa) केले.
कवी संजय होनकळस यांनी मनोगतात सांगितले की, “आयुष्याचे दालन आनंदाने फुलवण्यासाठी मला लाभलेले समाधान आणि आनंद रसिकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने मी कवितालेखन केले. त्या कविता आज पुस्तकरूपाने प्रकाशित होत असल्याचा आनंद अवर्णनीय (Anandacha Batwa)आहे.”
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी हरिनाथ कांबळे, संभाजी दंतेराव, अजितकुमार जमदाडे आणि काव्यमित्र संस्थेच्या कार्यकारिणीने विशेष सहकार्य केले. सुप्रिया जोगदंड यांनी सूत्रसंचालन केले, तर काव्यमित्र संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष राजेंद्र सगर यांनी आभार(Anandacha Batwa) मानले.
