Home व्यवसाय / अर्थ Pcmc Property Tax:३० जूनपर्यंत मालमत्ता करावर विविध सवलती; १ लाख ८२ हजारांहून अधिक नागरिकांचा लाभ

Pcmc Property Tax:३० जूनपर्यंत मालमत्ता करावर विविध सवलती; १ लाख ८२ हजारांहून अधिक नागरिकांचा लाभ

वेळेत कर भरून सवलतींचा लाभ घेण्याचे महापालिकेचे आवाहन

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. १८ मे २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने शहरातील मालमत्ताधारकांसाठी मालमत्ता कर भरण्यावर विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या सवलतींचा लाभ घेत वेळेत मालमत्ता कर भरावा, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले (Pcmc Property Tax) आहे.

 

महापालिकेकडून ३० जून २०२६ पर्यंत संपूर्ण मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करणाऱ्या नागरिकांना १० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. तसेच कुटुंबातील महिलेच्या नावावर असलेल्या एका निवासी मालमत्तेसाठी ३० टक्क्यांपर्यंत विशेष सवलत लागू करण्यात आली (Pcmc Property Tax)आहे.

 

महापालिकेच्या कर संकलन मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत तब्बल १ लाख ८२ हजार ३३५ मालमत्ताधारकांनी विविध कर सवलतींचा लाभ घेतला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरून १० टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. घरबसल्या सुलभ पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे ऑनलाइन भरण्याकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे दिसून येत (Pcmc Property Tax) आहे.

 

महापालिकेकडून चालू आर्थिक वर्षातील कर संकलनाबरोबरच थकीत कर वसुलीवरही विशेष भर दिला जात आहे. मालमत्ताधारकांना वेळेत माहिती मिळावी यासाठी आतापर्यंत ६ लाख ६५ हजार ४७० मालमत्तांचे कर बिल वाटप करण्यात आले आहे. तसेच थकीत कर न भरलेल्या मालमत्ताधारकांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ३४ हजार १०८ थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या(Pcmc Property Tax) आहेत.

 

१ एप्रिल २०२६ पासून सुरू झालेल्या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत १ लाख ८२ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरला असून, महापालिकेच्या तिजोरीत १८३ कोटी १४ लाख रुपयांचा महसूल जमा झाला (Pcmc Property Tax) आहे.

 

यापैकी १० टक्के ऑनलाईन सवलतीचा लाभ घेणाऱ्या मालमत्ताधारकांची संख्या सुमारे १ लाख ६५ हजार ४२४ इतकी असून, त्यांच्या माध्यमातून १६९ कोटी ५० लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. ऑनलाईन कर भरणा प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ वाचत असून, पारदर्शक आणि सोयीस्कर पद्धतीने कर भरण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचे महापालिकेच्या कर संकलन विभागाने स्पष्ट(Pcmc Property Tax) केले.

 

अधिकाधिक नागरिकांनी कर सवलतींचा लाभ घ्यावा आणि थकीत कराचा भरणा करावा, यासाठी महापालिकेकडून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. एसएमएस, कॉलिंग, होर्डिंग्ज, समाज माध्यमे तसेच विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवली जात (Pcmc Property Tax) आहे.

 

कोट :

 

“पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात नागरिकांनी भरलेला मालमत्ता कर अत्यंत महत्त्वाचा वाटा उचलतो. याच निधीतून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि इतर नागरी सुविधा अधिक सक्षम करण्याचे काम केले जाते. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेने दिलेल्या सवलतींचा लाभ घेत वेळेत मालमत्ता कर भरावा आणि शहर विकासात आपला सहभाग (Pcmc Property Tax) नोंदवावा.”

 

— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

 

कोट :

 

महापालिकेच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ३० जूनपूर्वी मालमत्ता कराचा भरणा करावा. ऑनलाईन पद्धतीने कर भरल्यास १० टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ मिळत आहे. तसेच महिलांच्या नावावरील निवासी मालमत्तांसाठी विशेष सवलत उपलब्ध आहे. थकीत कर असलेल्या मालमत्ताधारकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी तातडीने कर भरावा. नागरिकांनी वेळेत कर भरल्यास शहर विकासाच्या विविध प्रकल्पांना गती मिळण्यास मदत (Pcmc Property Tax) होईल.”

 

— सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00