Home माझं पिंपरी चिंचवड Lonavala Traffic Jam :मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा वाहतूक कोंडी; कामशेत बोगद्याजवळ वाहनांच्या रांगा

Lonavala Traffic Jam :मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा वाहतूक कोंडी; कामशेत बोगद्याजवळ वाहनांच्या रांगा

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सोमवारी सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली. कामशेत बोगदा परिसरात ट्रक अडकल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठा खोळंबा सहन करावा लागला.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप कायम असल्याचे सोमवारी पुन्हा एकदा समोर आले. मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सुरू असतानाही आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी एक्सप्रेसवेवर मोठा ट्रॅफिक जाम निर्माण झाल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा (Lonavala Traffic Jam) लागला.

 

विशेषतः कामशेत बोगदा परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने प्रवासी बराच वेळ खोळंब्यात अडकून(Lonavala Traffic Jam) पडले.

 

प्राथमिक माहितीनुसार, बऊर पुलाखाली एक अवजड ट्रक अडकल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. पुलाची उंची कमी असताना जास्त उंचीचा ट्रक पुलाखालून जाण्याचा प्रयत्न करत असताना तो मध्येच अडकला. परिणामी मागील बाजूस वाहनांच्या रांगा वाढत गेल्या आणि काही वेळातच मोठी वाहतूक कोंडी (Lonavala Traffic Jam) झाली.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. अडकलेला ट्रक बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, सोमवार असल्याने एक्सप्रेसवेवर वाहनांची संख्या मोठी होती. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत(Lonavala Traffic Jam) आहे.

 

या घटनेमुळे मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून वाहनचालकांनी संयमाने आणि सावधगिरीने प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले (Lonavala Traffic Jam) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00