पिंपरी-चिंचवड : स्वानंद महिला संस्था, पिंपरी-चिंचवड व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय महिला शाखेच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. स्वानंद संस्थेच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘माता त्रिशला माई रमा पुरस्कार’ देऊन या महिलांचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम बिजलीनगर येथील ब्रह्मचैतन्य हॉलमध्ये आयोजित करण्यात आला (Swanand Mahila Sanstha) होता.
या प्रसंगी उपमहापौर शर्मिलाताई बाबर, नगरसेविका आशाताई सूर्यवंशी, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, संस्थेच्या संस्थापिका व राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष प्रा. सुरेखा कटारिया तसेच स्वानंदच्या अध्यक्षा शोभा बंब यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात(Swanand Mahila Sanstha) आले.
यंदाचे पुरस्कार सौ. ताराबाई मदनलाल बाकलीवाल, सौ. लताजी अशोकजी पगारिया आणि केशरबाई हरकचंदजी भन्साळी यांना उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते प्रदान करण्यात (Swanand Mahila Sanstha) आले.

कार्यक्रमात ‘स्वानंदी जगण्याची कला’ या विषयावर चर्चासत्रही आयोजित करण्यात आले होते. कीर्तनकार डॉ. श्वेता राठोड आणि शुभांगी कात्रेला यांनी सकारात्मकतेने जीवन कसे जगावे, नकारात्मकतेवर मात कशी करावी यावर प्रभावी मार्गदर्शन केले. चर्चासत्रात उपस्थित महिलांनी आपल्या जीवनातील अनुभव मांडत उपस्थितांना प्रेरित केले. यामध्ये शर्मिलाताई बाबर, आशाताई सूर्यवंशी, प्रा. सुरेखा कटारिया आणि शोभा बंब यांनीही सहभाग (Swanand Mahila Sanstha) घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंत्राने कंचनमाला बाफना व सुनिता कांकरिया यांच्या सुमधुर आवाजात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा बंब यांनी (Swanand Mahila Sanstha) केले.
या सोहळ्यास कासारवाडी संघाचे अध्यक्ष विलासजी पगारिया, दापोडी संघाचे अध्यक्ष दिलीपजी भन्साळी, पिंपरी-चिंचवड जैन महासंघाचे अध्यक्ष श्रेयसजी पगारिया, पारस भवनचे अध्यक्ष देवेंद्रजी बाकलीवाल, जैन विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारणी सदस्य चंद्रकांतजी भन्साळी, जैन कॉन्फरन्स पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश कटारिया, तपस्वी प्रवीणजी भन्साळी, स्वानंदच्या माजी अध्यक्षा सुनिता देसर्डा, राजश्री बिनायकिया, मंजू धोका, तपस्वी मंगलताई भन्साळी आदी मान्यवर उपस्थित (Swanand Mahila Sanstha) होते.
कार्यक्रमाचे संयोजन सविता बाँटिया, मनीषा चोरडिया, अलका कुंकूलोळ, रोहिणी भटेवरा, अंजली वर्टी, पायल ललवाणी आणि शलाका कटारिया यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी कात्रेला यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. वैशाली लोढा यांनी (Swanand Mahila Sanstha) मानले.
