पिंपरी-चिंचवड : “नव्या नेतृत्वाने निष्पक्षपातीपणे काम करत छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्याबाई होळकर यांच्या आदर्शांवर आधारित सुशासन द्यावे. सत्तेचा मोह न ठेवता जनतेप्रती बांधिलकी जपली पाहिजे,” असे मार्गदर्शन स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी (All India Bramhan Fedration )केले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात नवनिर्वाचित महापौरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्वामी गोविंददेव गिरी महाराज प्रमुख वक्ते म्हणून बोलत (All India Bramhan Fedration )होते.
यावेळी त्यांनी दिवंगत भाजप शहराध्यक्ष अंकुशराव लांडगे यांच्या कार्याचे स्मरण करत पिंपरी-चिंचवडसारख्या भागात राष्ट्रीय विचार दृढ करण्यासाठी त्यांच्या योगदानाचा गौरव केला. तसेच अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणापासून दूर राहून राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचा सल्ला (All India Bramhan Fedration )दिला.
या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे, राजस्थानचे मंत्री झाबरसिंह खर्रा, कॅबिनेट मंत्री अविनाश गेहलोत, आमदार उमा खापरे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित (All India Bramhan Fedration) होते.
कार्यक्रमात पिंपरी-चिंचवडच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, महापौर रवी लांडगे आणि उपमहापौर शर्मिला बाबर यांचा स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शंखनाद व मंत्रोच्चारात कार्यक्रमाची सुरुवात झाली असून परशुराम पूजन व दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात (All India Bramhan Fedration) आले.
प्रास्ताविकात डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी पुण्यात ‘पेशवे सृष्टी’ थीम पार्क उभारण्याची संकल्पना मांडली. तसेच महासंघाच्या वतीने भगवान परशुराम यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे व संबंधित चौकाचे नामकरण करण्याची मागणी करण्यात (All India Bramhan Fedration) आली.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी हा सत्कार आशीर्वाद मानत “राष्ट्र प्रथम” या भूमिकेतून काम करण्याची ग्वाही दिली. समाजातील वाढती जातीय दरी कमी करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त (All India Bramhan Fedration) केली.
महापौर रवी लांडगे यांनी शहर विकासासाठी विविध उपक्रमांची माहिती देताना नदी सुधार प्रकल्प, दुर्गादेवी टेकडी परिसरात ऑक्सिजन पार्क, ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. तसेच भगवान परशुराम स्मारक उभारण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त (All India Bramhan Fedration)केला.
आमदार उमा खापरे यांनी धर्मप्रसार व रक्षणासाठी संतांचे कार्य महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. तर अश्विनीकुमार चौबे यांनी ही भूमी स्वराज्याची असल्याचे सांगत विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील अपमानास्पद वक्तव्यांवर टीका(All India Bramhan Fedration) केली.
कार्यक्रमाला वृषाली शेकदार, राजन बुडूख, केतकी कुलकर्णी, अमोघ पाठक, वैभव खरे, वैषाली कुलकर्णी, आरती कोशे, चंद्रशेखर चिंचोळकर, अशोक भंडारी, राहुल साकतकर, अश्विन इनामदार, ( All India Brahmin Federation) पवन वैद्य, दिलीप जोशी, दिलीप सातभाई, अनिरुद्ध बडवे, दिलीप कुलकर्णी, अभय कुलकर्णी भाऊ कुलकर्णी मकरंद कुलकर्णी अश्विन इनामदार सुषमा वैद्य, संजय परळीकर आदी पदाधिकारी उपस्थित(All India Bramhan Fedration) होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निमंत्रक महेश बारसावडे पुष्कराज गोवर्धन संध्या कुलकर्णी, आर्य इनामदार श्यामकांत कुलकर्णी, अतुल इनामदार, प्रवीण कुरबेट, राहुल जोशी, संगीता कुलकर्णी, आर्य इनामदार, प्रशांत कुलकर्णी, भूषण जोशी, मुकुंद कुलकर्णी, नेहा साठे, आनंद देशमुख, मकरंद कुलकर्णी, , कविता बारसावडे, कमलेश जोशी आणि पूर्वा गुंफेकर ऋजुता इनामदार हे कार्यरत (All India Bramhan Fedration)होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केले, तर विजय शेकदार यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम (All India Bramhan Fedration)घेतले.
