प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासताना इ.स.पूर्व सहावे शतक विशेष लक्षात घेण्यासारखे आहे. या काळात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात मोठे बदल घडून आले. प्रचलित आचार-विचारांना नवी दिशा देण्याचे कार्य याच शतकाने केले. या नवविचारांचे प्रमुख मार्गदर्शक होते गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर. बुद्धांनी बौद्ध धर्माचा, तर महावीरांनी जैन धर्माचा प्रचार, प्रसार आणि आचरण (Mahavir Jayant) iकेले.
आज वर्धमान महावीरांची २६२५ वी जयंती साजरी होत आहे (जन्म इ.स.पूर्व ५९९). या निमित्ताने त्यांनी दिलेला अहिंसेचा संदेश, त्यांचे जीवनकार्य आणि जैन धर्माचे तत्त्वज्ञान—विशेषतः आजच्या जागतिक संघर्षमय परिस्थितीत—समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे (Mahavir Jayant)आहे.
इ.स.पूर्व सहाव्या शतकात जैन धर्माचा वेगाने प्रसार झाला. जैन धर्मात ऋषभदेव पहिले, पार्श्वनाथ तेवीसावे आणि वर्धमान महावीर चोवीसावे तीर्थंकर मानले जातात. वर्धमान महावीरांनी वयाच्या ३०व्या वर्षी राजवैभवाचा त्याग करून मानवकल्याणासाठी आयुष्य अर्पण केले. त्यांच्या या निर्णयामागील सामाजिक आणि धार्मिक पार्श्वभूमी समजून घेतल्यास त्यांच्या पुरोगामी विचारांची जाणीव(Mahavir Jayant) होते.
ऋग्वेद काळात धार्मिक आचार साधे आणि सर्वसामान्यांसाठी सुलभ होते. परंतु उत्तरवेदकाळात यज्ञयागांना अधिक महत्त्व प्राप्त झाले. कर्मकांड वाढले आणि त्यातून पशुहिंसा वाढू लागली. धार्मिक जीवन गुंतागुंतीचे आणि सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेले. परिणामी समाजात अस्थिरता निर्माण झाली आणि नव्या विचारांची गरज भासू लागली. ही पोकळी जैन आणि बौद्ध धर्मांनी भरून(Mahavir Jayant) काढली.
इ.स.पूर्व ५९९ मध्ये मगधातील क्षत्रियकुंड येथे राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला यांच्या पोटी वर्धमान यांचा जन्म झाला. ऐश्वर्यसंपन्न जीवन असूनही त्यांची वृत्ती वैराग्यपूर्ण होती. वयाच्या ३०व्या वर्षी त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून तपश्चर्येचा मार्ग स्वीकारला. बारा वर्षांच्या कठोर साधनेनंतर त्यांना ‘केवलज्ञान’ प्राप्त झाले आणि ते ‘महावीर’ म्हणून प्रसिद्ध (Mahavir Jayant) झाले.
महावीरांनी जैन धर्माचे तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांनी देवावर अवलंबून न राहता प्रयत्नवादावर भर दिला. जैन धर्मानुसार विश्वनिर्मितीसाठी कोणताही ईश्वर कारणीभूत नाही. मानवी जीवनातील सुख-दुःख हे स्वतःच्या कर्मांवर अवलंबून(Mahavir Jayant) असते.
जैन धर्मातील ‘अनेकांतवाद’ हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणत्याही गोष्टीकडे एकाच दृष्टिकोनातून पाहू नये, तर विविध बाजूंनी विचार करावा—ही त्याची शिकवण आहे. हा दृष्टिकोन वैज्ञानिक विचारांशी सुसंगत(Mahavir Jayant) आहे.
महावीरांनी पंचमहाव्रतांची शिकवण दिली—अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. या तत्त्वांचे पालन केल्यास मानवी जीवन अधिक शुद्ध आणि नैतिक बनते. विशेषतः अहिंसेला त्यांनी अत्यंत महत्त्व दिले. आजच्या काळातही ही शिकवण तितकीच उपयुक्त(Mahavir Jayant) आहे.
विज्ञान आणि धर्म या दोन्हींचा मूलभूत उद्देश मानवी कल्याण हाच आहे. परंतु चुकीच्या वापरामुळे विज्ञान विनाशकारी ठरू शकते, तसेच धर्मही अंधश्रद्धा आणि कर्मकांडात अडकतो. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनातून धर्माचे आकलन होणे आवश्यक (Mahavir Jayant) आहे.
आजच्या विभाजनकारी वातावरणात महावीरांचे विचार अधिकच महत्त्वाचे ठरतात. त्यांच्या तत्त्वज्ञानातून सहिष्णुता, समता आणि मानवतेचा संदेश मिळतो. विज्ञान आणि धर्म यांची सांगड घालूनच समाजाचे खरे कल्याण साधता येईल—हीच महावीरांच्या जयंतीची खरी शिकवण(Mahavir Jayant) आहे.
डॉ राजेंद्र कांकरिया
लेखक शहरातले जेष्ठ साहित्यिक, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी आहेत
