Home माझं पिंपरी चिंचवड Pcmc Commissioner controversy:“PCMC ला जगात ओळख नाही?” — नवनियुक्त आयुक्तांच्या वक्तव्याने शहरात संतापाची लाट

Pcmc Commissioner controversy:“PCMC ला जगात ओळख नाही?” — नवनियुक्त आयुक्तांच्या वक्तव्याने शहरात संतापाची लाट

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या “PCMC ला जगात ओळख नाही” या वक्तव्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिक, पत्रकार आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

by Admin
Spread the love

नवनियुक्त आयुक्तांचा वादग्रस्त सूर; ‘PCMC ला जगात ओळख नाही’ वक्तव्यावर संताप

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) नव्याने रुजू झालेल्या आयुक्तांनी पदभार स्वीकारताना “पत्रकार हे माझे डोळे आणि कान आहेत” असे म्हणत सकारात्मक संवादाची ग्वाही दिली होती. मात्र, काहीच दिवसांत केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांनी स्वतःवरच टीकेची झोड ओढवून घेतली (Pcmc Commissioner controversy)आहे.

 

गंधर्व मंच संगीत स्पर्धेच्या पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी “अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची जगभर ओळख आहे, मात्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला जगात कोणी ओळखत नाही,” असे विधान केले. या वक्तव्याने शहरातील नागरिक, पत्रकार आणि विविध सामाजिक घटकांमध्ये संतापाची लाट उसळली (Pcmc Commissioner controversy)आहे.

 

औद्योगिक, शैक्षणिक आणि आयटी क्षेत्रात झपाट्याने प्रगती करणाऱ्या पिंपरी-चिंचवडची ओळख देश-विदेशात निर्माण झाली असताना, अशा प्रकारचे विधान शहराच्या प्रतिमेला धक्का देणारे असल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेषतः, आशियातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या शहराबाबत अशी भूमिका मांडणे हे गैरजबाबदारपणाचे लक्षण असल्याची टीका होत (Pcmc Commissioner controversy)आहे.

 

या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त २ एप्रिल ते ७ जूनदरम्यान विविध स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. मात्र, कार्यक्रमाच्या माहितीपेक्षा आयुक्तांच्या वक्तव्याचीच अधिक चर्चा(Pcmc Commissioner controversy) रंगली.

 

पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांनीही या विधानावर तात्काळ आक्षेप घेत, पिंपरी-चिंचवडसारख्या प्रगत शहराची प्रतिमा नकारात्मक पद्धतीने मांडणे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले. यानंतर शहराच्या अस्मितेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही या मुद्द्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता (Pcmc Commissioner controversy)आहे.

 

नवीन आयुक्तांकडून अपेक्षित असलेली संवेदनशीलता आणि शहराबद्दलचा अभिमान या घटनेतून दिसून न आल्याने, त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता या वादावर आयुक्त काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले (Pcmc Commissioner controversy)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00