चिंचवड, ता. २४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालय यांच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने “निर्भय कन्या अभियान” अंतर्गत एकदिवसीय कराटे प्रात्यक्षिक व महिला हक्क व संरक्षण विषयक मार्गदर्शन कार्यक्रम महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार (Nirbhay Kanya Abhiyan) पडला.
मुलींमध्ये स्वसंरक्षणाची जाणीव, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींना वैयक्तिक सुरक्षिततेबाबत जागरूक करणे आणि दैनंदिन जीवनात स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू (Nirbhay Kanya Abhiyan) होता.
कमला एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा प्रतिभा शहा आणि सचिव डॉ. दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम होत्या. यावेळी कराटे प्रशिक्षक सतीश राजहंस, सारिका राजहंस, शिवानी राजहंस, अॅड. डॉ. शुभा पिल्ले तसेच विद्यार्थी विकास अधिकारी अॅड. प्रा. गीता कांबळे उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा सत्कार प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम यांच्या हस्ते करण्यात (Nirbhay Kanya Abhiyan)आला.
कराटे प्रशिक्षक सतीश राजहंस, सारिका राजहंस आणि शिवानी राजहंस यांनी त्यांच्या अनुभवांच्या आधारे विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी नेहमी सतर्क आणि सज्ज राहणे किती आवश्यक आहे, यावर त्यांनी विशेष (Nirbhay Kanya Abhiyan)भर दिला.
कार्यक्रमादरम्यान स्वसंरक्षणाचे विविध तंत्र, परिस्थितीचे अचूक आकलन, तात्काळ निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास वाढविण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे विविध तंत्रे विद्यार्थिनींसमोर सादर (Nirbhay Kanya Abhiyan)केली.
विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत प्रत्यक्ष सराव केला. धोकादायक परिस्थितीतून कसे स्वतःचे रक्षण करावे, याचे मूलभूत तंत्र त्यांनी आत्मसात केले. हा कार्यक्रम संवादात्मक, माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी (Nirbhay Kanya Abhiyan)ठरला.
महिला हक्क व संरक्षण विषयावर अॅड. डॉ. शुभा पिल्ले यांनी सखोल मार्गदर्शन करत विद्यार्थिनींच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रस्तावना आणि शेवटी आभार प्रदर्शन अॅड. प्रा. गीता कांबळे यांनी(Nirbhay Kanya Abhiyan) केले.
एकूणच, हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी अत्यंत उपयुक्त ठरून त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली तसेच स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण (Nirbhay Kanya Abhiyan)झाली.
