पिंपरी-चिंचवड (निगडी) : निगडी परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात २० मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६:४५ वाजण्याच्या सुमारास थरमॅक्स चौक ते खंडोबा माळ या रस्त्यावर (Nigdi Accident) घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय रमेश जिंदल (वय ५६) हा कार (MH 14 KN 6825) भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत होता. यावेळी त्याने रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या रामखिलावन यादव (वय ५९) यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात यादव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू(Nigdi Accident) झाला.
या प्रकरणी निगडी पोलिसांनी कार चालक संजय जिंदल याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात (Nigdi Accident) आहे.
