प्रतिनिधी ‘दि. २१ : पवित्र रमजान महिन्यानंतर साजरी होणारी रमजान ईद पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. महिनाभर रोजा (उपवास) पाळून, प्रार्थना व इबादत करणाऱ्या मुस्लिम बांधवांनी ईदच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देत बंधुभावाचा संदेश (Ramzan Eid 2026) दिला.
रमजान महिन्यात मुस्लिम बांधव भल्या पहाटेपासून संध्याकाळपर्यंत अन्न व पाण्याचा त्याग करून उपवास करतात. दिवसभरात पाच वेळा नमाज अदा केली जाते, तसेच रात्री तरावीह नमाज व कुरआन पठण केले जाते. या काळात गरजू व गरीबांना मदत करण्यालाही विशेष महत्त्व दिले जाते. चंद्रदर्शनानंतर दुसऱ्या दिवशी ईद-उल-फित्र साजरी केली (Ramzan Eid 2026)जाते.

आज सकाळपासूनच शहरातील विविध मशिदींमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र जमले होते. नवीन कपडे परिधान करून, अत्तर लावून त्यांनी सामुदायिक नमाज अदा केली. मौलानांनी ईदचे महत्त्व सांगणारे प्रवचन दिले. नमाजानंतर एकमेकांना आलिंगन देत “ईद मुबारक”च्या शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यात आली. महिलांनी व लहान मुलांनीही घरोघरी नमाज अदा करून उत्सवात सहभाग घेतला. मोबाईलच्या माध्यमातून नातेवाईकांना शुभेच्छा पाठवण्यात (Ramzan Eid 2026) आल्या.
घराघरांत पारंपरिक शीरखुर्मा तयार करून नातेवाईक, मित्रपरिवारासोबत त्याचा आस्वाद घेतला गेला. त्यामुळे सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला (Ramzan Eid 2026) मिळाले.
चिंचवडगाव येथील ईदगाह मैदानावर आलमगीर शाही मशिदीच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अध्यक्ष इमरान पानसरे, अख्तर पिंजारी, मौलाना मिनहाज शेख, मौलाना इमानुल हक यांच्या उपस्थितीत विविध मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चासकर, रणजीत जाधव, संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. बी. दुबे, माजी नगरसेवक राजू गोलांडे, तसेच इतर मान्यवरांचा समावेश (Ramzan Eid 2026) होता.
नमाजानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मुस्लिम समाजाच्या वतीने या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त करण्यात(Ramzan Eid 2026) आले.
शहरातील खराळवाडी, नेहरूनगर, संत तुकाराम नगर, वल्लभनगर, गांधीनगर, पिंपरी, कासारवाडी, पिंपळे गुरव, चिंचवड स्टेशन परिसर, निगडी, आकुर्डी आदी भागांतील मशिदींमध्येही मोठ्या प्रमाणावर सामुदायिक नमाज अदा करण्यात आली. सर्वत्र शांतता, बंधुता आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या उत्सवामुळे शहरात आनंदाचे वातावरण निर्माण (Ramzan Eid 2026) झाले.
गुलामअली भालदार
सदर लेख शहरातले मुक्त पत्रकार आहे फोटोग्राफर आहेत
