पिंपळे गुरव : दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण व जागृती या सेवाभावी संस्थांच्या वतीने रविवार, १५ मार्च २०२६ रोजी पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर “डोळे ठेवा निरोगी, खा आंबा, पपई, गाजर, कोबी” या विषयावर पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात (Healthy Eyes Awareness) आली.
सकाळच्या वेळी व्यायामासाठी आणि फिरण्यासाठी उद्यानात येणाऱ्या नागरिकांपर्यंत आरोग्याचा संदेश पोहोचावा या उद्देशाने हे पथनाट्य सादर करण्यात आले. पथनाट्यातून डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी योग्य आहाराचे महत्त्व सांगण्यात (Healthy Eyes Awareness)आले.
या पथनाट्यात सांगवी-पिंपळे गुरव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप नन्नवरे, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे अध्यक्ष आण्णा जोगदंड, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, संगीता जोगदंड, मुरलीधर दळवी आणि शामराव सरकाळे यांनी सहभाग(Healthy Eyes Awareness) घेतला.
यावेळी बोलताना डॉ. प्रदीप नन्नवरे म्हणाले की, डोळे ही परमेश्वराने माणसाला दिलेली अमूल्य देणगी आहे. डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहारात ‘अ’ जीवनसत्त्वाचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे विविध डोळ्यांचे विकार निर्माण होऊ शकतात. आंबा, पपई, गाजर आणि कोबी या पदार्थांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. पथनाट्य हे जनजागृतीसाठी प्रभावी माध्यम असल्याने उद्यान परिसरात हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी (Healthy Eyes Awareness)सांगितले.
मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे अध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले की, धकाधकीच्या जीवनात लोकांना निरोगी आणि सुलभ जीवनशैलीकडे मार्गदर्शन करण्यासाठी दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था पथनाट्य, प्रभात फेरी अशा विविध उपक्रमांद्वारे सातत्याने जनजागृती करत (Healthy Eyes Awareness)आहेत.
यावेळी गुणवंत कामगार सुभाष चव्हाण, पंकज पाटील, महंमद शरीफ मुलानी, बाळासाहेब साळुंके, संजय गमे, गजानन धाराशिवकर, पांडुरंग सुतार तसेच परिसरातील उदय ववले, हिरामण देवरे, आरोग्य विभागाचे निरीक्षक शंकर घाटे, रश्मी तुंडलवार, उमेश बोरसे, निलेश हंचाटे, आरोग्य मुकादम राहुल ओव्हाळ, पवन रंधे, आशा गायकवाड, राहुल जाधव, शुभम बेंद्रे, गणेश वाडेकर, पूजा जाधव, पूजा कोरी, सागर नागुलकर, सुनंदा तामचीकर, सुवर्णा कांबळे, विवेक जाविर, काशिनाथ जोशी, मोबिन पठाण, सागर पाटील आणि महेश सूर्यवंशी उपस्थित (Healthy Eyes Awareness)होते.
राष्ट्रगीताने पथनाट्याची सांगता करण्यात(Healthy Eyes Awareness) आली.
