Home प्रेरणा / यशकथा PCMC Top 10:पिंपरी-चिंचवडमध्ये ‘पीसीएमसी टॉप १० पुरस्कार २०२६’ वितरण; पत्रकारिता संपली तर समाज संपेल – डॉ. हेमंत देसाई

PCMC Top 10:पिंपरी-चिंचवडमध्ये ‘पीसीएमसी टॉप १० पुरस्कार २०२६’ वितरण; पत्रकारिता संपली तर समाज संपेल – डॉ. हेमंत देसाई

पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘पीसीएमसी टॉप १० पुरस्कार २०२६’ सोहळ्यात डॉ. हेमंत देसाई यांनी पत्रकारिता आणि साहित्याच्या नात्यावर भाष्य करत निर्भीड पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पत्रकारिता आणि साहित्य यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध असून पत्रकारांनी विविध क्षेत्रांमध्ये रस निर्माण करून सातत्याने अभ्यास व वाचन केले पाहिजे. लिखाण मोजके, पण दर्जेदार असावे. चुकीवर प्रहार करताना चांगल्या कामाचे कौतुक करण्याची भूमिका पत्रकारांनी घेतली पाहिजे. पत्रकारिता संपली तर समाजही संपेल, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. हेमंत देसाई यांनी व्यक्त (PCMC Top 10) केले.

 

पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित “पीसीएमसी टॉप १० पुरस्कार २०२६” वितरण सोहळ्यात ते बोलत होते. हा कार्यक्रम गुरुवारी खराळवाडी, पिंपरी येथे पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात (PCMC Top 10)आले.

 

डॉ. देसाई म्हणाले की, पत्रकारांना समाजातील घटनांकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची क्षमता असावी. त्या घटना अचूक पद्धतीने टिपून वाचकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पत्रकारांवर आहे. पत्रकारांनी प्रचंड वाचन करून विविध विषयांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यामुळे लिखाण अधिक व्यापक आणि बहुआयामी(PCMC Top 10) बनते.

 

सध्याच्या पत्रकारितेच्या स्थितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, काही प्रमाणात पत्रकारिता नीचांकाला पोहोचल्याचे दिसते. किरकोळ आणि गौण विषयांनाही अनावश्यक प्रसिद्धी दिली जाते. काही माध्यमांमध्ये प्रवक्त्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनाच बातमीचे स्वरूप दिले जात (PCMC Top 10)आहे.

 

ते पुढे म्हणाले की, आज अनेक पत्रकारांना निर्भीडपणे लिहिणे कठीण झाले आहे. काही वेळा लिहिलेली बातमी छापली जात नाही आणि छापण्याचा आग्रह केला तर नोकरी जाण्याची भीती निर्माण होते. देशातील मीडिया मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेट क्षेत्राच्या प्रभावाखाली गेला असून काही वृत्तवाहिन्या सरकारची बाजू घेणाऱ्या भूमिकेत दिसतात. समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्येही माध्यमांमधून वारंवार प्रसिद्ध केली जातात. अशा आक्षेपार्ह गोष्टींविरोधात जनतेनेही आवाज उठवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जनतेशी निगडित प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे आणले जात असल्याची टीकाही त्यांनी (PCMC Top 10)केली.

 

यावेळी महापौर रवी लांडगे म्हणाले की, महापालिकेकडून काही चुका झाल्यास पत्रकारांनी त्या निश्चितपणे निदर्शनास आणून द्याव्यात. त्यामुळे प्रशासनाला सुधारणा करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर चांगल्या कामांचे कौतुक करून प्रोत्साहन देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पुण्याच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरात अराजकीय क्लब सुरू करण्याची कल्पनाही त्यांनी मांडली. अशा उपक्रमांमधून विविध विषयांवर सकारात्मक चर्चा घडू शकते, असे त्यांनी (PCMC Top 10)सांगितले.

 

उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले की, गुणवंतांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. हा पुरस्कार शेवट नसून नव्या जबाबदारीची सुरुवात आहे. पत्रकारिता ही समाजातील चळवळींतून निर्माण झालेली शक्ती आहे. शहरातील पत्रकारांनी अन्यायाविरुद्ध लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. साहित्य आणि संस्कृती टिकली तरच समाज टिकेल. औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडची ओळख आता सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातही निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद (PCMC Top 10)केले.

 

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, काही ठिकाणी पुरस्कार व्यवस्थापित केल्याची टीका होत असते. मात्र पत्रकार संघाने निवडलेले पुरस्कारार्थी पाहता कोणालाही अभिमान वाटावा अशी ही निवड असल्याचे त्यांनी(PCMC Top 10) सांगितले.

 

पुरस्कारार्थींच्या वतीने बोलताना ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांनी पत्रकारांवरील वाढत्या दबावाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, पत्रकारांची मुस्कटदाबी होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतील फूट होऊनही अनेक राजकीय प्रश्न प्रलंबित आहेत. न्यायव्यवस्था आणि संसदीय लोकशाहीसमोरही विविध आव्हाने उभी आहेत. महापालिका प्रशासनातील भ्रष्टाचारावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी पत्रकारांनी या विषयांवर जाब विचारण्याची गरज व्यक्त केली. पत्रकारिता टिकवायची की नाही याचा विचार आता जनतेनेही करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद(PCMC Top 10) केले.

 

कार्यक्रमात राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्यांनाही गौरविण्यात आले. यात प्रथम क्रमांक ‘वर्ल्ड सामना’, द्वितीय ‘थिंक पॉझिटिव्ह’, तृतीय ‘गावगाथा’ आणि चतुर्थ ‘आनंद तरंग’ या दिवाळी अंकांना प्रदान करण्यात (PCMC Top 10)आला.

 

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा जणांना “पीसीएमसी टॉप १०” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रातील अविनाश चिलेकर, शासकीय सेवेत मकरंद निकम, कामगार नेतृत्वात शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे, शैक्षणिक क्षेत्रात प्रशांत पाटील, वास्तुविशारद दीपक पाटील, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. राजेंद्र फिरके, सामाजिक कार्यातील हणमंत माळी व रमेश वाघेरे, छायाचित्रकार नरेश नातू आणि क्रीडा क्षेत्रातील मनीषा राठोड यांचा यामध्ये समावेश (PCMC Top 10)होता.

 

याशिवाय प्रसिद्ध व्याख्यात्या शारदाताई मुंडे, अशोक बेलापूरकर, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ आणि पाचंगे यांचाही विशेष सन्मान करण्यात (PCMC Top 10)आला.

 

कार्यक्रमाला उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, माजी महापौर योगेश बहल, महिला व बालकल्याण समिती सभापती राणीमाई पठारे, शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, नगरसेवक शेखर चिंचवडे, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे तसेच महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अधिकारी हरविंदर बन्सल, सुनील पवार, विजय भोजने, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित (PCMC Top 10)होते.

 

पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी प्रास्ताविकात पत्रकारांच्या समस्या मांडत पदाधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी(PCMC Top 10) केले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डिजिटल मीडिया अध्यक्ष अमोल डंबाळे, वरिष्ठ उपाध्यक्ष बाबू कांबळे, उपाध्यक्ष विनय लोंढे, रेहान सय्यद, चिटणीस संतोष जराड, कोषाध्यक्ष गणेश शिंदे, प्रसिद्धीप्रमुख युनुस खतिब, सरचिटणीस मुकेश जाधव तसेच कार्यकारिणी सदस्य प्रसाद बोरसे, जितेंद्र गवळी, अशोक लोखंडे, शबनम सय्यद, विश्वास शिंदे आदींनी विशेष परिश्रम (PCMC Top 10)घेतले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00