Home तंत्रज्ञान Pune Metro :पीसीएमसी ते निगडी मेट्रो विस्ताराला गती; ७८.५ कोटींचा करार

Pune Metro :पीसीएमसी ते निगडी मेट्रो विस्ताराला गती; ७८.५ कोटींचा करार

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महापालिका (पीसीएमसी) ते निगडी या प्रस्तावित उन्नत मेट्रो मार्गिकेच्या विस्तारकामाला वेग आला आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांनी ४.४१ किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेवरील चार स्थानकांतील तांत्रिक सुविधांची कामे Colossus Infra Projects Pvt Ltd या कंपनीला दिली आहेत. सुमारे ७८.५ कोटी रुपयांचा करार करण्यात आला असून पुढील पावणेदोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट (Pune Metro)  आहे.

Pune Metroच्या दुसऱ्या टप्प्यात स्वारगेट–पीसीएमसी या सध्या कार्यरत ‘पर्पल लाईन’चा निगडीपर्यंत विस्तार केला जाणार आहे. राज्य सरकारने फेब्रुवारी २०२१ मध्ये या प्रकल्पास मंजुरी दिली होती. त्यानंतर २०२३ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ आणि सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने सुमारे १,०४८ कोटी रुपयांच्या खर्चाला अंतिम मान्यता (Pune Metro) दिली.

या विस्तारामध्ये चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्ती-शक्ती अशी चार उन्नत स्थानके उभारली जाणार आहेत. स्थानकांची संरचना, विद्युत पुरवठा, सरकते जिने, लिफ्ट तसेच ई-अँड-एम यंत्रणांसह विविध तांत्रिक सुविधा उभारण्याची जबाबदारी संबंधित कंपनीकडे देण्यात आली आहे. २९ ऑगस्ट २०२५ रोजी तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या होत्या. आर्थिक निविदा प्रक्रियेनंतर कोलोसस इन्फ्रा प्रोजेक्ट्सची बोली सर्वात कमी (Pune Metro)  ठरली.

सध्या पर्पल लाईन पीसीएमसी ते स्वारगेट दरम्यान १७.४ किलोमीटरपर्यंत कार्यरत असून त्यात १४ स्थानके आहेत. निगडीपर्यंत विस्तार झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड व निगडी परिसरातील नागरिकांना पुण्याच्या मध्यवर्ती भागात थेट, जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होईल, असा विश्वास महामेट्रोकडून व्यक्त करण्यात आला (Pune Metro) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00