Home माझं पिंपरी चिंचवड Ghuman Punjab visit:महाराष्ट्र–पंजाब आध्यात्मिक नाते अधिक दृढ – महापौर रवि लांडगे

Ghuman Punjab visit:महाराष्ट्र–पंजाब आध्यात्मिक नाते अधिक दृढ – महापौर रवि लांडगे

गुरु ग्रंथ साहिबातील संत नामदेवांच्या अभंगांमुळे महाराष्ट्र आणि पंजाबचे आध्यात्मिक नाते अधिक दृढ असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले. घुमान येथील ५ दिवसीय अभ्यास दौऱ्यातील संतपीठ सदस्यांचा सन्मान.

by Admin
Spread the love

पिंपरी, १६ फेब्रुवारी २०२६: गुरु ग्रंथ साहिब मध्ये संत परंपरेतील अनेक संतांच्या वाणीसह संत नामदेव महाराजांच्या अभंगांचा समावेश असल्याने महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील आध्यात्मिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ झाले आहे. भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारा हा वारसा राष्ट्रीय एकात्मतेचे सुंदर उदाहरण असल्याचे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी (Ghuman Punjab visit) केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ यांच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराजांनी वास्तव्य केलेल्या घुमान येथे नुकताच ५ दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात सहभागी १८ सदस्यांचा सन्मान दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात महापौरांच्या हस्ते करण्यात (Ghuman Punjab visit)आला.

या प्रसंगी उपायुक्त तथा संतपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप खोत, शिक्षणाधिकारी तथा संतपीठाच्या सचिव संगीता बांगर, संचालिका डॉ. स्वाती मुळे, संचालक हभप राजू महाराज ढोरे, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे यांच्यासह शिक्षक व सदस्य उपस्थित (Ghuman Punjab visit) होते.

अभ्यास दौऱ्यादरम्यान घुमान इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, बाबा नामदेवजी गव्हर्नमेंट डिग्री कॉलेज व बाबा आया सिंग रिअरकी कॉलेज येथे शैक्षणिक भेटी देण्यात आल्या. तसेच घुमान येथील संत नामदेव महाराज मंदिरात “तु अगाध वैकुंठनायका | तेरे चरणो मेरा माथा ||” या अभंगावर हिंदीत प्रथमच वारकरी परंपरेनुसार किर्तन सेवा संपन्न (Ghuman Punjab visit) झाली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00